MIM Malegaon Politics: मालेगावात 'एमआयएम'ची पाकिस्तान मुर्दाबादची गर्जना, म्हणाले, महिलांसह भारतीय सैन्य पाकिस्तानचा दारुण पराभव करेल!

Maulana Mufti Ismail; Sophia Qureshi and Vyomika Singh will be enough to defeat Pakistan army -'एमआयएम'च्या पाकिस्तान मुर्दाबाद घोषणांनी मालेगाव शहर दुमदुमले.
MLA Maulana Mufti ismail
MLA Maulana Mufti ismailSarkarnama
Published on
Updated on

Operation Sindoor news: भारताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर राबविले. यामध्ये दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले. या कारवाईचे मालेगाव शहरात एमआयएम पक्षाकडून जोरदार स्वागत करण्यात आले. मालेगाव शहरात ‘एमआयएम’ पक्षातर्फे पाकिस्तानच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.

‘एमआयएम’चे आमदार मौलाना मुक्ती इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी शहरात शुक्रवारी प्रार्थनेनंतर निदर्शने केली. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, भारत जिंदाबाद यासह विविध घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणांनी मालेगाव शहर दुमदुमले.

MLA Maulana Mufti ismail
India Air Strike: धक्कादायक...सीमेवर युद्धाचा तणाव, अधिकारी मात्र देवदर्शन, पंचतारांकीत पाहुणचार अन् वाइनरीत रमले!

मालेगाव शहरातील मुशावरत चौकापासून ही रॅली निघाली. रॅली निघाल्यानंतर मार्गात शेकडो कार्यकर्ते त्यात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते. पाकिस्तान, दहशतवादाच्या विरोधात तसेच कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग जिंदाबाद या कार्यकर्त्यांनी दिलेला घोषणा चर्चेचा विषय ठरल्या.

MLA Maulana Mufti ismail
Chhagan Bhujbal Politics: भारत-पाक युद्ध स्थिती...छगन भुजबळ म्हणतात, नागरिकही देऊ शकतात लष्कराला योगदान!

दहशतवादाच्या आडून मानवतेला काळीमा फासणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या महिलांसह भारतीय सैन्य पाकिस्तानला धडा शिकविण्यास पुरेसे आहे. भारताचे सैन्य पाकिस्तानचा पराभव करून त्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

भारतीय सैन्याने पाकिस्तान मध्ये घुसून त्यांना धडा शिकवला आहे. या कारवाईचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही सर्व भारतीय सैन्याच्या विजयासाठी कामना करतो. एक मुखाने भारतीय सैन्य बरोबर राहून त्यांना पाठिंबा देत आहोत, असे आमदार मौलाना मुफ्ती यांनी सांगितले.

ते म्हणाले, याच मालेगाव शहरात १९२२ मध्ये ब्रिटिश सरकारचा पराभव करण्यासाठी सेना स्थापन करण्यात आली होती. त्याचे नाव आझाद हिंद सेना होते. आम्ही सर्व भारतीय सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. प्रत्येक मुस्लिम नागरिकाचा भारतीय सैन्याला मनापासून पाठिंबा राहील, असा दावा आमदार मौलाना मुफ्ती यांनी केला.

यावेळी ‘एमआयएम’ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देशाची फाळणी झाल्यावर भारतातील मुस्लिमांनी हाच आमचा देश आहे असे जाहीर केले होते. मुलांना अबुल कलाम आझाद यांनी दिल्लीच्या जामा मशीद येथून भारतातील सर्व मुस्लिमांना हाच आपला देश आहे असे सांगितले होते. सर्व मुस्लिम समाज या देशावर आणि देशाच्या सैन्यावर प्रेम करतो. पाकिस्तानला धडा शिकविण्याशिवाय स्वस्थ बसता कामा नये

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com