Pakistan Former PM Imran Khan Sarkarnama
देश

Imran Khan : इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ ; निवडणूक आयोगाने उमेदवारी नाकारली!

Mayur Ratnaparkhe

Pakistan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आगामी सार्वत्रिक निवडणूक लढवण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. कारण, दोन्ही मतदारसंघासाठीचे त्यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत.

इम्रान खान यांनी आगामी निवडणुकीअगोदर पंजाबची राजधानी लाहोरच्या एनए-122 आणि आपला घरचा मतदासंघ मियांवलीच्या एनए-89 येथून उमेदवार अर्ज दाखल केला होता.

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ(पीटीआय)चे संस्थापक आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान(Imran Khan) यांना तोशखाना प्रकरणी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली आहे. इम्रान खान यांना मागील वर्षी एप्रिला 2022 मध्ये पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले होते. सरकारी भेटवस्तूंची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक आयोगाने इम्रान खान यांचा उमेदवारी अर्ज फेटाळल्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. आयोगाने म्हटले आहे की, इम्रान खान हे मतदारसंघाचे नोंदणीकृत मतदार नाहीत. यााशिवाय न्यायालयाने त्यांना दोषी आणि अयोग्य ठरवले आहे. तर त्यांची उमेदवारी रद्द झाल्याची माहिती त्यांच्या मीडिया टीमने दिले आहे.

आगामी निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या(पीटीआयएफ) नेत्यांना भेटण्याची परवानगी द्यावी, अशी याचिका इम्रानने दाखल केली होती. शुक्रवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पीटीआय नेत्यांना आणि वकिलांना पाकिस्तानचे(Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आदियाला तुरुंगात भेटण्याची आणि आठ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यासाठी बैठक घेण्याची परवानगी दिली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT