Narendra Modi : " पंतप्रधान मोदींना भारताचा भगवा पाकिस्तान करायचाय..."; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, त्यातल्या अनेक गोष्टी...
Pm Narendra Modi
Pm Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Goa News : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.या निवडणुकांच्या प्रचाराच्या अजेंड्यावर भाजप राम मंदिरासह हिंदुत्त्वाचा मुद्दा असणार आहेत.याच दरम्यान आता निवृत्त पोलीस अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविषयी खळबळजनक दावा केला आहे.

गोव्यातील एका कार्यक्रमात निवृत्त प्रशासकीय अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले.याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपविषयी धक्कादायक विधान केल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.(BJP)

Pm Narendra Modi
BJP News: मला पक्षातून काढलं तर भष्ट्राचाराचा भांडाफोड करणार; भाजप आमदाराने पक्षाच्या विरोधात ठोकला शड्डू

ज्युलिओ रिबेरो म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, त्यातल्या अनेक गोष्टी या फक्त मतांसाठी असतात.पण केरळमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने त्यांनी दिलेला संदेश हा त्यांच्यात घडून आलेल्या हृदयपरिवर्तनामुळे असावा अशी मला आशा आहे. तसे असेल,तर ती एक चांगली बाब म्हणावी लागेल.पण त्यांचा मूळ हेतू हा भारताचा भगवा पाकिस्तान करणं आहे असे मोठे विधान रिबेरो यांनी यावेळी केले आहे.रिबेरो यांनी 1984 मध्ये सुवर्ण मंदिरात करण्यात आलेल्य ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली पार पडली होती.

सध्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) हिंदू आणि ख्रिश्चन समुदायाला दुय्यम नागरिक म्हणून वागणूक दिली जात आहे.तीच परिस्थिती भारतात निर्माण होईल की काय? अशी भीती मला वाटत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

ख्रिसमसच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) निवासस्थानी 25 डिसेंबरला खास कार्यक्रम पार पडला. त्यात अनेक कलाकार,नेते,अधिकारी आणि इतरांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते.यावरही रिबेरो यांनी मत मांडले.ते म्हणाले,मोदी केरळमध्ये मोठ्या संख्येनं असणाऱ्या ख्रिश्चन समुदायाला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांच्यातील एक बिशप मोदींच्या या प्रयत्नांना सहमती दर्शवली.पण ज्यावेळी एक बिशप मोदींच्या धोरणांशी सहमत झाले म्हटल्यावर इतर ख्रिश्चन धर्मीही देखील सहमत होऊ शकतात.मोदी नेमकं काय करू पाहातायत हे पाहावं लागणार असल्याचेही ज्युलिओ रिबेरो म्हणाले.

Pm Narendra Modi
Ashok Pawar News : आमदार शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोर्चात, पण शेतकऱ्यांनाच पोलिसांची नोटीस...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com