Imran Khan Sarkarnama
देश

Imran Khan News : इम्रान खान यांना मोठा धक्का!, पाकिस्तान सरकारने 'पीटीआय' पक्षावर बंदीचा घेतला निर्णय

Pakistan Government decide to ban PTI party : पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षावर देशविरोधी आरोपांखाली बंदी घालणार असल्याची माहिती, पाकिस्तान सरकारचे मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी दिली आहे.

Mayur Ratnaparkhe

Pakistan Political News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. आता पाकिस्तान सरकारने इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान(Pakistan) सरकारचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी म्हटले की, पाकिस्तान सरकार तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षावर देशविरोधी आरोपांखाली बंदी घालणार आहे.

तरार यांनी एका पत्रकारपरिषदेत पीटीआय शिवाय देशाला पुढे जाण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला आणि म्हटले की, सरकारने पीटीआयवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सरकारच्या या निर्णयामागे विश्वसनीय पुराव्यांचा हवाला दिला आहे.

तसेच कायदेशीर प्रकरणी इम्रान खान(Imran Khan) यांचे प्रवक्ते तरार नईम हैदर पंजुथा यांनी पत्रकारपरिषदेचे उत्तर देताना म्हटले की, सरकारला पीटीआयवर बंदी घालण्याचा अधिकार नाही. या आधी रविवारी पाकिस्तानच्या एका न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना कथित भ्रष्टाचाराच्या एका नवीन प्रकरणात तपासासाठी आठ दिवसांच्या कोठडीसाठी भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यांना सोपवलं गेले होतं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT