Pakistan Election Result 2024 : इम्रान खान यांनी तुरुंगातून विरोधकांना पाजलं पाणी! निवडणुकीत मोठी आघाडी...

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान सध्या तुरुंगात असून, त्यांच्या पक्षाचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले आहेत.
Imran Khan
Imran KhanSarkarnama
Published on
Updated on

Islamabad : पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचा पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे इम्रान खान हे सध्या तुरुंगात असून, त्यांना निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह आयोगाने गोठवले. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे सर्व उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले होते. (Pakistan Election 2024)

पाकिस्तानच्या संसदेत (Pakistan Parliament) 336 जागा असून, त्यापैकी 266 जागांसाठी मतदान होते. त्यामुळे 165 जागांसाठी गुरुवारी मतदान झाले. त्यापैकी 60 जागा महिलांसाठी, तर दहा जागा अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत. सत्ता स्थापनेसाठी 133 जागांवर विजय मिळणे आवश्यक आहे. गुरुवारी मतदान झाल्यानंतर निवडणूक (Election) आयोगाने सुरू केलेली मतमोजणी अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे.

Imran Khan
Mayawati News : कांशीराम यांचे नाव घेत मायावतींची मोदींकडे मोठी मागणी...

आतापर्यंत आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार इम्रान खान (Imran Khan) यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इंसाफ (PTI) पक्षाने पाठिंबा दिलेले 60 अपक्ष उमेदवार विजयी झाली आहेत, तर माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाझ (PML-N) या पक्षाला 43 जागा मिळाल्या आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीने (PPP) 37 जागा जिंकल्या आहेत. बिलावल झरदारी भुट्टो यांचा हा पक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुकीत या तीन पक्षांमध्ये खरी लढत आहे. सध्याच्या निकालाचे कल पाहता कोणत्याही पक्षाला 133 हा जादुई आकडा गाठता येणार नसल्याचे दिसते. असे असले तरी इम्रान खान यांचा पक्ष बहुमताजवळ पोहाेचू शकतो. मात्र, नवाझ शरीफ यांच्या पक्षाकडूनही विजयाचा दावा केला जात आहे.

नवाज शरीफ अपक्षांच्या संपर्कात?

सत्ता स्थापनेसाठी नवाज शरीफ (Nawaj Sharif) यांनी हालचाली सुरू केल्याचे सांगितले जात आहे. काही अपक्ष उमेदवार तसेच इतर छोट्या पक्षांशी संपर्क साधला जात असल्याची चर्चा आहे. इम्रान खान यांच्या पक्षाचा पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवारांशीही ते संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे पाकिस्तानात कुणाची सत्ता येणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहाेचली आहे.

R

Imran Khan
Abhishek Ghosalkar Case : घोसाळकरांचं प्लॅनिंग मॉरिसला माहिती होतं! गोळ्या झाडून तो ओरडतच बाहेर आला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com