Imran Khan arrest updates Sarkarnama
देश

Imran Khan Arrest Updates: पाकिस्तान पेटलं ; सहा जणांना मृत्यू , राज्यपाल, लष्कर कार्यालयाचा घेतला ताबा..

Pakistan Imran Khan Arrest Protest: रात्री उशिरा रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयाची तोडफोड केली.

सरकारनामा ब्यूरो

Pakistan Imran Khan Arrest Protest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना काल (मंगळवारी) अटक करण्यात आली. यामुळे काल सांयकाळपासून पाकिस्तानात त्यांच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी तोडफोड, जाळपोळ करण्यास सुरवात केली आहे. यात सहा जणांना मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज देशभरातील खासगी शाळा बंद राहणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. देशातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अल कादिर विद्यापीठ घोटाळा प्रकरणी लष्कराने मंगळवारी इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक केली. त्यानंतर देशभर जाळपोळ सुरु आहे.

इम्रान खान यांची अटक बेकायदा असल्याचे पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या समर्थकांचे मत आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) चे समर्थकांनी मंगळवारी रात्री उशिरा रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयाची तोडफोड केली.

लाहोरमधील गव्हर्नर हाऊस जाळण्यात आले. कराचीच्या कँट परिसरात हल्ला झाला.पीटीआय समर्थकांनी रात्री उशिरा लाहोरमधील लष्कर कमांडरच्या घराला आग लावली. आणखी अनेक लष्करी अधिकाऱ्यांच्या घरांवर हल्ले झाले.

मनी लाँड्रिंग व कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप त्यांच्यावर आहे. इम्रान खान हे दोन प्रकरणात जामिनासाठी उच्च न्यायालयात पोहोचले होते, त्याठिकाणी पाकिस्तान रेंजर्सने त्यांना मंगळवारी अटक केली.

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि पंजाब प्रांतात दोन दिवस कलम 144 लागू करण्यात आले आहे. पेशावरमध्ये 30 दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. या घटनेत आत्तापर्यंत पाच ते सहा लष्करी अधिकारी जखमी झाले आहेत. तर 43 आंदोलकांना लष्कराने ताब्यात घेतले आहे. (Political Short Videos)

चार-पाच दिवस ते तपास यंत्रणा एनएबीच्या ताब्यात राहतील, असे पाकिस्तानमधील माध्यमांनी वृत्त दिले आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे पीटीआय नेते फवाद चौधरी यांनी म्हटले आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT