Narendra Modi - Shehbaz Sharif Sarkarnama
देश

India Pakistan Conflicts : पाकिस्तान आलं ताळ्यावर, शाहबाज शरीफ म्हणाले, आम्ही शांततेसाठी चर्चा करण्यास तयार

Shehbaz Sharif ready for peace talks, India Pakistan relations : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे बदला घेतला. त्यात अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. भारताने दणका दिल्यानंतर आता पाकिस्तान टाळ्यावर आलं आहे.

Ganesh Sonawane

India Pakistan Conflicts : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे बदला घेतला. त्यात अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. भारताने दणका दिल्यानंतर आता पाकिस्तान टाळ्यावर आलं आहे. भारताला युद्ध व अणुहल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत शांततेत चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी भारताला चर्चेचा प्रस्ताव दिला. शांतता प्रस्तापित करण्यासाठी पाकिस्तान भारतासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे वक्तव शरीफ यांनी केलं आहे. पंजाब प्रांतातील कामरा हवाई तळाला भेट देताना शाहबाज यांनी हे विधान केलं. तेथे त्यांनी भारतासोबत झालेल्या लष्करी संघर्षात सहभागी असलेल्या अधिकारी आणि सैनिकांशी संवाद साधला. यावेळी भारतासोबत चर्चा आणि शांततेच्या अटींमध्ये काश्मीर चा मुद्दा देखील सामाविष्ट असल्याचे त्यांनी नमूद केलं.

तर जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी आणि दहशतवादी अड्डे नष्ट करत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही, असं भारताने ठणकावले आहे. जम्मू आणि काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश व लडाखचा केंद्रशासित प्रदेश हे नेहमीच आपला अभिन्न आणि अविभाज्य भाग राहतील असे भारताने याआधीच अनेकदा स्पष्ट सांगितलं आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात झालेल्या 26 जणांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. त्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार करत भारताने बदला घेतला. त्यानंतर आता भारताने आपला मोर्चा जम्मू काश्मीर भागातील स्थानिक दहशतवाद्यांकडे वळवला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 14 दहशतवाद्यांची एक यादी जाहीर केली होती. गेल्या 48 तासात या यादीतील सहा दशतवाद्यांना भारतीय सैन्यानं कंठस्नान घातलं आहे. तर उरलेल्या 8 जणांचा शोध सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी ऑपरेशन केलरमध्ये तीन दहशतवादी ठार झाले होते. तर गुरुवारी सकाळी राबवलेल्या ऑपरेशन नादरमध्ये आणखी तीन दहशतवादी मारले गेले.

दरम्यान भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं होतं. पाकिस्तान जेव्हा त्यांच्या देशातील सर्व दहशतवादी संरचना आणि त्यांच्याशी असलेले संबंध संपवण्यास तयार असेल तेव्हाच पाकिस्तानशी चर्चा केली जाईल, असे पंतप्रधानांनी तेव्हा स्पष्ट केलं होतं. दहशतवाद आणि बोलणी एकाचवेळी होऊ शकत नाही. पाणी आणि रक्त एकाच वेळी सोबत वाहू शकत नाही, असं मोदींनी ठणकावून सांगितलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT