Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर' केवळ ढोंग, दिखाव्यासाठी 3-4 विमानं हवेत पाठवली अन्...; काँग्रेस आमदाराने मागितले कारवाईचे पुरावे

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांची निर्घृन हत्या केली. या हत्येचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील दहशवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला.
Operation Sindoor
Operation SindoorSarkarnama
Published on
Updated on

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांची निर्घृन हत्या केली. या हत्येचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील दहशवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला.

भारतीय लष्कराच्या या कारवाईचं संपूर्ण देशासह जगभरातून स्वागत केलं जात आहे. मात्र, कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार कोथुर मंजुनाथ यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर शंका उपस्थित केली केली आहे.

ऑपरेशन सिंदूर हे फक्त कारवाईचं ढोंग होतं, अद्याप पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळालेला नाही, असं वक्तव्य आमदार कोथुर मंजुनाथ यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Operation Sindoor
Vyomika Singh Controversy : सोफिया कुरेशीनंतर आता विंग कमांडर व्योमिका सिंगबद्दल वादग्रस्त विधान, खासदाराने थेट जातच काढली, म्हणाले, 'राजपूत नाही...'

आमदार मंजुनाथ नेमकं काय म्हणाले?

ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करताना आमदार कोथुर मंजुनाथ म्हणाले, हे सर्व ढोंह होतं. काहीही झालेलं नाही. फक्त दिखाव्यासाठी तीन-चार विमानं पाठवून परत बोलावली. या कारवाईमुळे पहलगाममध्ये हत्या झालेल्या 26 लोकांना न्याय मिळेल का? ज्यांच्या घरातील लोक मारले गेले त्या महिलांचे दुःख कमी होईल का?

त्याचा सन्मान करण्याचा हा मार्ग आहे का? असे सवाल उपस्थित करत त्यांनी लष्कराच्या कारवाईवर शंका उपस्थित केली. तसंच यावेळी आमदार मंजुनाथ यांनी 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार मारल्याच्या दाव्यावरही शंका व्यक्त केली. ते म्हणाले, "100 दहशतवादी मारले गेले हे निश्चितपणे माहिती आहे का?

Operation Sindoor
Amit Shah Controversy : 'अमित शाह 'मातोश्री'च्या दारात घामाघूम होऊन उभे होते...बाळासाहेबांनी वाचवलं', संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

त्यांची ओळख काय आहे? मारले गेलेले दहशतवादीच 22 एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात हल्ला करणारे होते का? दहशतवादी आत घुसले तेव्हा सीमेवर सुरक्षा का नव्हती? ते पळून कसे गेले? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

शिवाय आपण दहशतवादाची पाळेमुळे शोधून त्याचा नायनाट केला पाहिजे. हा हल्ला म्हणजे गुप्तचर यंत्रणेचे पूर्ण अपयश असल्याचंही आमदार मंजुनाथ म्हणाले. दरम्यान, आम्ही कर्नाटक, पाकिस्तान, चीन किंवा बांगलादेश कुठल्याही नागरिकांविरुद्धच्या युद्धाविरोधात आहोत, असंही ते यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com