Shahbaz Sharif, Nawaz Sharif sarkarnama
देश

Pakistan Politics : निवडणुकीच्या चार दिवसानंतर पाकिस्तानचा पंतप्रधान ठरला; नवाझ शरीफ यांनी केली घोषणा

Shahbaz Sharif :पीएमएल-एन पक्षाला 74 तर, पीपीला 54 जागा मिळाल्या आहेत. मुत्ताहिदा कौमी मूव्हेमेंट-पाकिस्तान या पक्षाला 17 जागा मिळाल्या आहेत.

Roshan More

Political News : पाकिस्तानमध्ये निवडणूक पार पडून चार दिवस झाले आहेत. कुठल्याही पक्षाला बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता. तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या पक्ष सर्वाधिक 101 जागांवर विजयी झाला आहे. मात्र, सरकार स्थापनेसाठी 132 जागांची आवश्यकता असल्याने ते बहुमतापासून खूपच दूर आहेत. नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) आणि बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात युती झाली आहे. आणखी चार पक्ष सत्तेत सहभागी होणार असून शाहबाज शरीफ हे पाकिस्ताचे नवे पंतप्रधान असणार आहेत. (Pakistan Politics)

पीएमएल-एन पक्षाला 74 तर, पीपीला 54 जागा मिळाल्या आहेत. मुत्ताहिदा कौमी मूव्हेमेंट-पाकिस्तान या पक्षाला 17 जागा मिळाल्या आहेत. तब्बल सहा पक्ष मिळून सरकार स्थापन करणार आहेत. पंतप्रधानपदासाठी नवाज शरीफ यांचे लहान भाऊ मोहम्मद शाहबाज उमेदवार असतील. नवाझ शरीफ यांच्या पक्षाकडूनच तशी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सहा पक्षांच्या युतीमध्ये शाहबाज शरीफ हे पाकिस्ताचे नवे पंतप्रधान होणे हे निश्चित मानले जात आहे

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2022 मध्ये देखील शहबाज (Shahbaz Sharif ) हे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले होते. 2022-2023 या कालावधीत ते पाकिस्ताचे पंतप्रधान होते. आपले मोठे बंधू माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांच्या पाठोपाठ मोहम्मद शाहबाज हे राजकारणात आले. ते मुळचे व्यवसायिक आहेत. पाकिस्तानमधील पंजाब प्रातांतून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. पंजाब विधानसभेचे ते सभासद देखील होते.

नवाझ शरीफ यांनी सत्तेची विभागणी करताना आपला लहान भाऊ शाहबाज यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. तर आपली मुलगी मरियम नवाझ शरीफ हिला पंजाब प्रांताची मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी घोषित केली. सत्तेत सहभागी होणारे बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पक्षाला पाकिस्तानचे राष्ट्रपतीपद मिळणार आहे. असीफ अली झरदारी हे राष्ट्रपती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT