Security and rescue teams inspect the damaged passenger train after the deadly Quetta train blast in Balochistan. Sarkarnama
देश

Pakistan Train Blast : पाकिस्तान पुन्हा हादरलं! प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोट; 23 जण जागीच ठार, 'या' गटाने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

Quetta Bomb Explosion : पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट क्वेटा येथील चमन फाटक परिसरात झाला. स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर रेल्वे रुळांजवळ आग लागली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

Jagdish Patil

Pakistan Train Blast : पाकिस्तान पुन्हा एकदा भीषण बॉम्बस्फोटाने हादरले आहे. बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथील चमन फाटक परिसरात एका पॅसेंजर ट्रेनवर आत्मघातकी बॉम्बहल्ला करण्यात आला. या भीषण हल्ल्यात आतापर्यंत किमान २३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ५० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे ट्रॅकजवळ झालेल्या शक्तिशाली स्फोटामुळे ट्रेनचे काही डबे रुळावरून घसरले. या हल्ल्याची जबाबदारी बंदी घालण्यात आलेल्याबलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) या संघटनेने स्वीकारली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी घडवून आणण्याच्या उद्देशाने हा हल्ला पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आला होता.

पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट क्वेटा येथील चमन फाटक परिसरात झाला. स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर रेल्वे रुळांजवळ आग लागली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत बीएलएच्या दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतर सूड म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचा दावा बीएलएकडून करण्यात आला आहे. या स्फोटामुळे आसपासच्या परिसरातही मोठे नुकसान झाले आहे. जवळच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून, घटनेनंतर पोलिस, बचाव पथक आणि सुरक्षा दलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले.

या स्फोटात 'जाफर एक्सप्रेस' या ट्रेनच्या एका डब्याला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही ट्रेन पेशावरकडे रवाना होणार होती. हल्ल्यानंतर बीएलएने निवेदन जारी करत या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT