Donald Trump Attack : अमेरिका पुन्हा हादरली! हल्लेखोरांनी थेट 'व्हाईट हाऊस'लाच केलं टार्गेट, ट्रम्प आतमध्ये असतानाच तुफान गोळीबार

White House Shooting Incident : व्हाईट हाऊसबाहेरील एका मुख्य सुरक्षा तपासणी नाक्याजवळ शनिवारी (ता.२३) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक बंदूकधारी व्यक्ती पश्चिम बाजूच्या व्हाईट हाऊसच्या गेटजवळ आला आणि त्याने तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या दिशेने अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
Donald Trump Attack | White House Shooting Incident
Security forces stand guard near the White House after a shocking shooting incident during Donald Trump’s presence in Washington DC. Sarkarnama
Published on
Updated on

White House Shooting Incident : अमेरिकेच्या 'व्हाइट हाऊस' परिसरात भीषण गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबाराने अमेरिकेत एकच खळबळ उडाली आहे. तर गोळीबाराच्या घटनेनंतर गुप्तहेर खात्याने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत एक संशयित हल्लेखोर ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

या गोळीबारानंतर सुरक्षेच्या कारणास्तव व्हाईट हाऊस परिसर लॉकडाऊन करण्यात आला होता. महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना घडली त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्येच उपस्थित होते आणि ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचं प्रशासनाने स्पष्ट करण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

व्हाईट हाऊसबाहेरील एका मुख्य सुरक्षा तपासणी नाक्याजवळ शनिवारी (ता.२३) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक बंदूकधारी व्यक्ती पश्चिम बाजूच्या व्हाईट हाऊसच्या गेटजवळ आला आणि त्याने तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या दिशेने अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

Donald Trump Attack | White House Shooting Incident
Cockroach Janta Party: देशभरात चर्चा झालेल्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या अभिजीत दिपकेला धमकी; संभाजीनगर पोलिसांचा संरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार यावेळी त्याने अंदाजे ३० गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. दरम्यान, यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या कम्युनिकेशन ऑफिसने या घटनेची माहिती दिली. जयामध्ये त्यांनी संशयित हल्लेखोराचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. शिवाय या घटनेवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यावेळी व्हाईट हाऊसमध्ये होते.

Donald Trump Attack | White House Shooting Incident
Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीकडे देशाचं लक्ष; खर्गेंची पुनर्निवड जवळपास निश्चित, देवेगौडांच्या उमेदवारीवर सस्पेन्स कायम

परंतु या घटनेचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही आणि त्यांचा कोणताही कर्मचारी जखमी झाला नसल्याचंही सिक्रेट सर्व्हिसने स्पष्ट केलं आहे. मात्र, नुकतंच काही दिवसांपूर्वी वॉशिंग्टन डीसी येथील 'व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स असोसिएशन'च्या डिनर कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर व्हाइट हाऊसजवळ पुन्हा अशाच प्रकारच्या गोळीबाराची घटना घडल्याने संपूर्ण अमेरिका हादरून गेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com