LeT terrorist Amir Hamza:भारताच्या रडारवर असलेला दहशतवाद्यांच्या आका सध्या लाहोर येथील एका रुग्णालयात मरणयातना भोगतोय, नाव आहे आमिर हमजा. आमिर हमजा हा लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सय्यदचा साथीदार असून तो लष्कर ए तोयबाचा सहसंस्थापकही आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
दहशतावाद्यांच्या म्होरक्या आमिर हमजा हा रहस्यमयरित्या जखमी झाला आहे. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त होते, पण तो एका अपघातात गंभीर जखमी झाल्याचे समजते. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा झाल्याचे वृत्त आहे. लाहोर येथील एका रुग्णालयात तो मरणयातना भोगत आहे.
आमिर हमजा हा हाफिज सईद आणि अब्दुल रहमान मक्की यांचा निकटवर्तीय आहे. देशात विशेषता जम्मू-काश्मिरमध्ये आतकवादी कारवाईयात त्याचा मोठा सहभाग असल्याचे पोलिस तपासात आढळले आहे.
आमिर हमजावर अज्ञात व्यक्तींना हल्ला केला होता की त्याच्यावर गोळीबार केला आहे, या बाबतची माहिती गुलदस्तातच आहे. मुंबई बॅाम्बस्फोटातील तो आरोपी आहे. पाकिस्तानच्या पंजाबमधील गुजरांवाला येथील रहिवाशी आहे.अमेरिकेने 2012 रोजी त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर केले आहे.
पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर हल्लाच्या घटना वाढल्या आहेत. यात अनेक दहशतवादी जखमी झाले आहेत. 18 मे रोजी लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी सैफुल्लाह खालिदचा खात्मा करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात तीन अज्ञान बंदुकधार्यांनी गोळ्या झाडून त्याला मारलं आहे.आता त्यांच्या निशाण्यावर आमिर हमजा असल्याचे बोलले जाते.
आमिर हमजा याला मंगलवार सांयकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली. एका खासगी रुग्णालयातील उपचारानंतर त्याला लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
जम्मू आणि काश्मीरमध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी,
ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रांचा पुरवठा दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे चालवण्यात सहभागी.
दहशतवादी हमजाने लष्करासाठी निधी उभारण्यात महत्त्वाची भूमिका
नवीन दहशतवादी भरती करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली.
पीओकेमधील लाँच पॅडमध्ये त्यांची भूमिका.
मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी हमजा ऑपरेशनल कमांडर होता.
काश्मीरमधील शिव खोरी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ल्यात सहभागी
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.