Rahul Gandhi Tweet Sarkarnama
देश

Rahul Gandhi Tweet : संसदेची निर्मिती अहंकाराच्या विटांनी नव्हे, संवैधानिक मूल्यांनी होते; राहुल गांधींनी मोदींना सुनावलं !

Rahul Gandhi New Parliament Building : हा देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदाचा आपमान..

Chetan Zadpe

Rahul Gandhi Tweet : देशाच्या नव्या संसदभवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 28 मे रोजी होत आहे. मात्र, आता या संसदभवनाच्या इमारती उद्घाटनावरुन मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी बहिष्कार अस्त्र उपसले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गटासह तब्बल १९ पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकणार असल्याचं जाहीर केलं आहे. (Latest Marathi News)

याबाबात आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी ट्वीटमध्ये म्हणाले,"नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतीजींच्या हस्ते न करणे, तसेच त्यांना या कार्यक्रमाला निमंत्रित न करणं, हे देशाच्या सर्वोच्च सर्वोच्च संवैधानिक पदाचा अपमान आहे. संसद अहंकारच्या विटांनी नाही तर संविधानिक मूल्यांनी निर्माण होत असतं.

दरम्यान, नवीन संसदभवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर आत्तापर्यंत १९ विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकल्याची माहिती समोर येत आहे. यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, ठाकरे गट, राष्ट्रीय जनता दल, सीपीएम (CPM) आणि सीपीआय (CPI) यांसह इतरही अनेक पक्षांचा समावेश आहे. 28 मे रोजी पंतप्रधान मोदींऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नव्या संसदेचं उद्घाटन व्हावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रपती हेच संसदेचे प्रमुख असतात, म्हणून राष्ट्रपतींना आमंत्रित करावे, असे बहुतांश विरोधी पक्षांचे मागणी करत आहे.

अशी आहे नवीन संसद इमारत....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबर २०२० रोजी नवीन संसद भवनाच्या कामाचा शुभारंभ केला होता. १२०० कोटी रुपये खर्च करुन चार मजल्यांची इमारत उभी राहिली आहे. यामध्ये लोकसभेच्या ८८८ आणि राज्यसभेच्या ३८४ सदस्यांसाठी सदस्यांना बसण्याची व्यवस्था होणार आहे. फक्त २८ महिन्यांमध्ये ही इमारत बनून सज्ज झालीय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT