Supriya Sule Sarkarnama
देश

Supriya sule News : खासदार सुप्रिया सुळे ठरल्या दुसऱ्यांदा 'संसद महारत्न पुरस्कार'च्या मानकरी

Prime Point Foundation Chennai : चेन्नईस्थित प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि ई-मॅगझिनतर्फे दर पाच वर्षांनी सन्मानाची घोषणा

Amol Sutar

- मिलिंद संगई

Supriya sule News : चेन्नईमधील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि ई-मॅगझिनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा जाहीर झाला आहे. सतराव्या लोकसभेतील त्यांची उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभागासाठी, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

यापूर्वी सोळाव्या लोकसभेतील कामगिरीसाठीसुद्धा त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुढील वर्षी 17 फेब्रुवारी रोजी त्यांना हा पुरस्कार दिल्लीतील कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांचा (MP) प्राईम पॉईंट फाऊंडेशनतर्फे या पुरस्काराने सन्मान केला जातो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी दिली आहे.

सुप्रिया सुळे यांची ५ डिसेंबरपर्यंत लोकसभेत 94 टक्के उपस्थिती होती. त्यांनी 231 चर्चासत्रांत भाग घेतला आहे. सभागृहात त्यांनी आतापर्यंत 587 प्रश्न विचारले असून 16 खासगी विधेयके मांडली आहेत. याच संस्थेचा संसदरत्न पुरस्कार त्यांना सात वेळा प्रदान करण्यात आला आहे. यापूर्वीही त्यांना सर्वोत्तम कामगिरीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. (Loksabha Winter Session)

" हा पुरस्कार म्हणजे माझ्या कामाला मिळालेली पावती आहे. सर्वोत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी दर पाच वर्षांनी देण्यात येणाऱ्या विशेष संसद महारत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, याचा आनंद आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला लोकसभेत निवडून पाठविले तो सार्थ ठरविण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहू, ही ग्वाही या निमित्ताने देऊ इच्छिते," अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT