Asim Sarode Sarkarnama
देश

Parliament Security Breach: संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेची बाजू असीम सरोदे कोर्टात मांडणार

Ganesh Thombare

Delhi News: संसदेत बुधवारी घुसखोरीची घटना घडली. प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोघांनी सभागृहात उडी मारत स्मोक कँडल फोडल्या. त्यामुळे संसदेत मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली.

यामध्ये महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील अमोल धनराज शिंदे या तरुणाचा सहभाग आहे. आता या अमोल शिंदेंला कायदेशीर मदत करण्यासाठी अॅड.असीम सरोदे यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित माहिती दिली.

संसदेत घडलेल्या घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. संसदेत घुसखोरी केलेल्या घटनेत असणारा अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील चाकूरमधील रहिवासी आहे. अमोल शिंदे हा बेरोजगार असून तो पोलिस भरतीची तयारी करत होता. सध्या त्याची चौकशी सुरु आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बुधवारी दुपारी या आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. वकील असीम सरोदे हे अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार असून त्याची बाजू ते कोर्टात मांडणार आहेत. यासंदर्भात सरोदे यांनी फेसबुक पोस्ट लिहित माहिती दिली आहे.

सरोदेंनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं ?

"अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार"

"अमोल शिंदे याने काल संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहेत, ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल. अमोलचा उद्देश जर कुणाला दुखावण्याचा व इजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा मांडायचा होता तर त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे आणि त्याने वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल जाणीव देऊन त्याला सकारात्मक शिक्षा जरूर करावी, असे मला वाटते", असे सरोदेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT