Lok Sabha Security Breach : लोकसभेत घुसखोरीचा असा झाला प्लॅन! दीड वर्षांपूर्वी सहा जण भेटले अन्...

Lok Sabha News : लोकसभेत घुसखोरीसाठी सहा जणांकडून प्लॅन करण्यात आला होता.
Lok Sabha
Lok SabhaSarkarnama
Published on
Updated on

Parliament Winter Session : संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना बुधवारी घडली. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना दोन तरुणांनी लोकसभेत घुसखोरी केल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोकसभेत घुसखोरीसाठी मागील एक-दीड वर्षांपासूनच या तरुणांनी तयारी सुरू केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. तपास यंत्रणांच्या चौकशीत तरुणांकडून अनेक खुलासे केले जात आहेत.

लोकसभेत (Lok Sabha) घुसखोरीसाठी सहा जणांकडून प्लॅन करण्यात आला होता. त्यापैकी सागर शर्मा (Sagar Sharma) यांनी मनोरंजन डी (Manoranjan D) या दोघांनी प्रत्यक्ष लोकसभेत घुसखोरी केली. प्रेक्षक गॅलरीतून त्यांनी सभागृहात उडी घेत स्मोक कॅंडल जाळल्या. त्यामुळे सर्वत्र पिवळ्या रंगाचा धूर झाला होता. या दोघांनाही खासदारांनीच पकडून सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिले. त्यानंतर तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू करण्यात आली.

Lok Sabha
Lok Sabha Security Breach: संसदेतील घुसखोरीप्रकरणी लोकसभा सचिवालयाची मोठी कारवाई; आठ कर्मचारी निलंबित

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, वर्षभरापुर्वीच अत्यंत काळजीपुर्वकपणे हा प्लॅन तयार करण्यात आला हात. ललित झा हा यामागचा मास्टरमाईंड आहे. भगत सिंग फॅन क्लब या सोशल मीडियावर असलेया एका पेजच्या माध्यमातून सर्व सहा जण एकमेकांच्या संपर्कात आले. त्यानंतर ते दीड वर्षांपुर्वी म्हैसुरू येथे भेटले आणि त्यानंतर प्लॅन करण्याचे ठरले. सिग्नल अँपच्या माध्यमातून ते संपर्कात होते. त्यांच्या बैठकाही होत होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी मनोरंजन याने व्हिजिटर्स पासच्या माध्यमातून संसदेत प्रवेश केला होता. सागर शर्मा यानेही जुलै महिन्यात असाच प्रयत्न केला होता. या प्रयत्नांवेळी त्यांना सुरक्षेतील त्रुटी आढळल्या. त्यानुसार संसदेत सोडताना बुटांची तपासणी केली जात नव्हती. दरम्यानच्या काळात त्यांचा प्लॅन ठरला. त्यानुसार 6 आणि 10 डिसेंबर रोजी ते विविध राज्यांतून दिल्लीत दाखल झाले. दुसरा आरोपी विकीच्या घरी ते जमले. संसदेबाहेर आंदोलन करणारा दुसरा आरोपी अमोल शिंदे (Amol Shinde) याने महाराष्ट्रातून कॅंडल आणल्या होत्या, असे तपासात समोर आल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

Lok Sabha
Parliament Security Breach: संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेची बाजू असीम सरोदे कोर्टात मांडणार

बुधवारी त्यांनी भाजप खासदाराच्या पीएकडून पास घेतले आणि इंडिया गेटजवळ येत स्मोक कँडल दिले. त्यानंतर सागर आणि मनोरंजन दोघे 11 नंतर संसदेत दाखल झाले. त्यानंतर संधी साधून दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या घेतल्या. त्याचवेळी संसदेबाहेरही नीलम आणि अमोल शिंदे यांनी घोषणाबाजी करत स्मोक कँडल जाळल्या.

Lok Sabha
Sanjay Raut: 'हे सरकार तकलादू, सुरक्षेच्या नावाने बोंबाबोंब'; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

ललित झा हा सर्वांचे मोबाईल घेऊन पळून गेला आहे. सहा जणांपैकी पाच जणांना अटक करण्यात आली. दिल्ली पोलीसांच्या विशेष कक्षाकडून त्यांच्याविरोधात षडयंत्र, सुरक्षेचे उल्लंघन अशा विविध गुन्ह्यांसह युएपीए या कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कायदा प्रामुख्याने बेकायदेशीर हालचाली किंवा दहशतवादाला रोखण्यासाठी वापरला जातो.

(Edited By - Rajanand More)

Lok Sabha
Lok Sabha Security Breach: धमकी खरी ठरवल्यानंतर पन्नूने जाहीर केली संसदेतील घुसखोरांसाठी 10 लाखांची मदत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com