PM Narendra Modi in New Parliament
PM Narendra Modi in New Parliament Sarkarnama
देश

PM Narendra Modi Speech : तो लोकशाहीवरील काळा डाग! पहिल्याच दिवशी मोदींना झाली ‘त्या’ दिवसाची आठवण

Rajanand More

New Delhi : 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्री व खासदारांना सदस्यत्वाची शपथ दिली जाणार आहे. दरम्यान, सभागृहात जाण्यापुर्वी पंतप्रधान मोदींनी मीडियाशी संवाद साधला.

पंतप्रधान मोदींनी आणीबाणीची आठवण काढत अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, उद्या 25 जून आहे. ज्या लोकांची संविधान, लोकशाहीप्रति निष्ठा आहे, त्यांच्यासाठी हा न विसरता येणारा दिवस आहे. यादिवशी भारताच्या लोकशाहीला काळा डाग लागला होता, त्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत.

भारताच्या संविधानाला नाकारण्यात आले होते, देशाला जेल बनविण्यात आले होते. लोकशाहीला पूर्णपणे ताब्यात घेण्यात आले होते. नवी पिढी हे कधीच विसरणार नाही. आणीबाणीच्या 50 वर्षाच्या अनुषंगाने देशातील हा प्रत्येक जण संकल्प करेल की, भारतात पुन्हा कधीही अशी हिंमत करणार नाही, जी 50 वर्षांपुर्वी करण्यात आली होती, असे मोदी म्हणाले.

सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक असते. पण देश चालवण्यासाठी सहमती गरजेची असते. त्यामुळे प्रत्येकाच्या सहमतीने आणि प्रत्येकाला सोबत घेऊन लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही करतो. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जात निर्णयांना गती देऊ इच्छितो. विरोधकही सहकार्य करतील, अशी अपेक्षा मोदींनी यावेळी व्यक्त केली.

स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा एखाद्या सरकारला सलग तिसऱ्यांदा जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे, त्यासाठीही ही निवडणूक महत्वाची आहे. संसदीय लोकशाहीमध्ये आजचा दिवस गौरवमय आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्या नव्या संसदेत हा शपथ सोहळा होत आहे. आतापर्यंत ही प्रक्रिया जुन्या संसदेत होत होती, असा आनंदही मोदी व्यक्त केला.

देशातील जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा संधी दिली आहे. हा विजय भव्य आणि महान आहे. त्यामुळे आमचे दायित्वही तीनपटीने वाढले. देशवासियांना मी विश्वास देतो की, आम्ही या कार्यकाळात आधीपेक्षा तीनपट वेगाने काम करू, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT