Delhi Rain Sarkarnama
देश

Parliament Session Live : दिल्लीत पावसाचा धुमाकूळ; संसदेतही धडकणार सरकारविरोधी वादळ

Delhi Rain Parliament Session 2024 Modi Government INDIA Alliance : दिल्लीतील पावसाने विमानतळावरील छताचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Rajanand More

New Delhi : मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या मान्सूनने अखेर शुक्रवारी दिल्लीत जोरदार हजेरी लावली. पहाटे पासून सुरू झालेल्या पावसाने दिल्लीत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. केवळ साडे तीन तासांच्या पावसाने दिल्ली-एनसीआरमधील अनेक भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दिल्ली विमानतळालाही पावसाचा फटका बसला असून टर्मिनल एक बाहेरील छताचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. पावसामुळेच ही घटना घडल्याच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी मृतकांच्या नातेवाईकांना 20 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

खासदारांना उचलून बसवले गाडीत

दिल्लीतील पावसाचा नेत्यांनाही फटका बसला आहे. संसदेत शुक्रवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. त्यामुळे बहुतेक मंत्री, खासदार दिल्लीतच आहे. पावसाने अनेक भागात पाणी साचल्याने अनेक नेत्यांना फटका बसला आहे. समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव यांच्या घराबाहेरही पाणी साचल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांनी उचलून घेत गाडीत बसवले. यादव यांनी यावरून प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.

सरकारवर विरोधक भडकले

विमानतळावर झालेल्या दुर्घटनेनंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्धवट कामाचे उद्घाटन केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तीन महिन्यांपुर्वीच दुर्घटनाग्रस्त भागाचे लोकार्पण झाले होते. त्यामुळे या मुद्यावरून संसदेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

नीटचा मुद्दाही गाजणार

नीट तसेच इतर परीक्षांमधील पेपरफुटीच्या मुद्द्यावरूनही विरोधक सरकारला संसदेत घेरणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेले दहशतवादी हल्ले, महागाई हे मुद्देही संसदेत गाजण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींनीही आपल्या भाषणात पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला होता. पण महागाई, दहशतवादी हल्ले, मणिपूर हिंसा यावर त्यांनी एकदाही उल्लेख केला नसल्याने विरोधकांनी अभिभाषणावर टीका केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT