Priyanka Gandhi On Om Birla : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांवर भडकल्या प्रियांका गांधी; नेमकं कारण काय?

Om Birla News : लोकसभेत अनेक सदस्यांनी शपथ घेताना 'जय संविधान'चे नारे लगावले होते. यातच एक शपथविधीवेळी ओम बिर्ला भडकले होते. त्यावरून प्रियांका गांधींनी सवाल उपस्थित केले आहेत.
priyanka gandhi om birla
priyanka gandhi om birlasarkarnama

Loksabha 2024 News : लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचं पहिलं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंग हुड्डा यांच्यावर भडकले. यानंतर काँग्रेसच्या नेत्या, प्रियांका गांधी यांनी ओम बिर्ला यांना सुनावलं आहे.

"भारतीय संसदेत 'जय संविधान'चे नारे लावू शकत नाही का?" असा सवाल प्रियांका गांधींनी ( Priyanka Gandhi ) ओम बिर्ला यांना विचारला आहे.

नेमकं घडलं काय?

संसद अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी काँग्रेस खासदार शशी थरूर ( Shashi Tharoor ) यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर 'जय संविधान,' अशी घोषणा दिली. यानंतर थरूर अध्यक्ष ओम बिर्ला ( Om Birla ) यांच्यासोबत हस्तांदोलन करून आपल्या जागेवर परतत होते. तेवढ्यात लोकसभा अध्यक्षांनी त्यांना हटकलं आणि म्हणाले, 'संविधानाची शपथ तर घेतच आहात, ही संविधानाचीच शपथ आहे.' अध्यक्षांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा उभे राहिले आणि म्हणाले, "यावर आपण आक्षेप घ्यायला नको होता सर..."

priyanka gandhi om birla
AAP : 'आप' सोडणार काँग्रेसची साथ, आता लक्ष्य 'दिल्ली'

यावर अध्यक्ष बिर्ला हुड्डांवर भडकले. "कशावर आक्षेप असावा किंवा कशावर नसावा, असा सल्ला देत जाऊ नका. चला खाली बसा," असं बिर्लांनी हुड्डांना म्हटलं.

priyanka gandhi om birla
DK ShivaKumar : कर्नाटकात मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा टशन; शिवकुमारांसाठी सिध्दरामैय्या सोडणार पद?

त्यानंतर आता प्रियांका गांधींनी बिर्ला यांच्या वक्तव्यावरून चांगलेच सुनावलं आहे. एक्स अकाउंटवर ट्वीट करत म्हणाल्या, "भारतीय संसदेत 'जय संविधान' बोलू शकत नाही का? संसदेत सत्ता पक्षाचे लोक असंसदीय आणि असंवैधानिक घोषणाबाजी करतात, तेव्हा रोखलं जात नाही. पण, विरोधी पक्षानं 'जय संविधान' म्हटल्यावर आक्षेप घेण्यात येतो. निवडणुकीवेळी करण्यात येत असलेला संविधानाचा विरोध आता नव्या रूपानं समोर येत आहे. जे संविधानाला दुबळे करू पाहत आहे."

"ज्या संविधानामुळे संसद चालते, ज्या संविधानाची प्रत्येक सदस्य शपथ घेतो, ज्या संविधानामुळे जनतेला सुरक्षा मिळते. आता विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी संविधानाला विरोध करणार का?" असा संतप्त सवाल प्रियांका गांधींनी ओम बिर्ला यांना विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com