AAP : 'आप' सोडणार काँग्रेसची साथ, आता लक्ष्य 'दिल्ली'

Delhi Assembly Election AAP Congress : दिल्लीमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीत आपला 70 पैकी 62 जागा मिळाल्या होत्या. तर, भाजपला BJP केवळ आठ जागा मिळाल्या होत्या.
Rahul Gandhi | Arvind Kejriwal
Rahul Gandhi | Arvind Kejriwal Sarkarnama
Published on
Updated on

AAP News : लोकसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये काँग्रेससोबत निवडणूक लढूनही आम आदमी पक्षाला (आप) एकही जागा जिंकता आली नाही. लोकसभेच्या सातही जागांवर भाजपने विजय मिळवला. त्यामुळे पुढील वर्षी होणारी दिल्ली विधानसभेची निवडणुक काँग्रेसची साथ सोडून स्वबळावर लढणार असल्याच्या हालचाली 'आप'मध्ये सुरु झाल्या आहेत.

इंडिया आघाडीत आप आणि काँग्रेस एकत्र आहेत. मात्र, दिल्लीमध्ये एकत्र लढणाऱ्या आप आणि काँग्रेसने पंजाबमध्ये एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढली. तेथे 13 पैकी सात जागा काँग्रेसने जिंकल्या तर आपला केवळ तीन जागा मिळाल्या. दिल्ली सरकारमधील मंत्री गोपाल राय यांनी देखील विधानसभा निवडणूक आप स्वबळावर लढणारे असल्याचे सांगितले होते.

इंडिया आघाडीत असताना ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक स्वबळावर लढली. तेथे त्यांना चांगले यश मिळाले. त्याच प्रमाणे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी आप करत आहे. दिल्लीमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीत आपला 70 पैकी 62 जागा मिळाल्या होत्या. तर, भाजपला BJP केवळ आठ जागा मिळाल्या होत्या.

Rahul Gandhi | Arvind Kejriwal
Bihar Politics : ‘एनडीए’मध्ये घमासान; भाजपच्या बड्या नेत्याचं नितीश कुमारांसह थेट प्रदेशाध्यक्षांना आव्हान

सहानुभूतीचा फायदा?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal हे मद्यधोरण आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात आहेत. तुरुंगात असूनही त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही. केजरीवाल हे तुरुंगात असल्याने त्यांच्या विषयी निर्माण होणाऱ्या सहानुभूतीचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत फायदा 'आप'ला मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Rahul Gandhi | Arvind Kejriwal
High Court On Rana : "ही अखेरची संधी," उच्च न्यायालयाचा राणा दाम्पत्याला इशारा; नेमकं प्रकरण काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com