Priyanka Gandhi, Amit Shah Sarkarnama
देश

Amit Shah News : प्रियांका गांधींचा मोदींना करारा जवाब; अमित शहांनी राज्यसभेत कात्रीत पकडलं, ‘त्या’ खासदारांची यादी तयार...

Vande Mataram debate : वंदे मातरमवर चर्चेला सुरूवात झाली त्यावेळी प्रियांका गांधी यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधीही सभागृहात उपस्थित नसल्याचा मुद्दा काढत अमित शहांनी काँग्रेसवर वार केला.

Rajanand More

Parliament discussion : वंदे मातरमला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संसदेत सोमवारपासून चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत या चर्चेला सुरूवात केली. काँग्रेस आणि पंडित नेहरूंनी वंदे मातरमचे तुकडे केले, विश्वासघात केल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. त्यानंतर काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणातून मोदींचा एक-एक मुद्दा खोडून काढत करारा जवाब दिला होता.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत बोलताना प्रियांका गांधींसह काँग्रेसवर पलटवार केला. वंदे मातरमचे तुकडे केले नसते तर देशाचेही तुकडे झाले नसते, असे सांगत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच काँग्रेस आणि या पक्षाचे नेते सतत वंदे मातरमला विरोध करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शहांनी हे सांगताना संसदेतीलच उदाहरण दिले. संसदेत वंदे मातरम सुरू होण्याआधी काँग्रेसचे, इंडिया आघाडीचे काही सदस्य सभागृहातून बाहेर जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या विधानावर काँग्रेस सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर शहांनी अशा सदस्यांची यादीच आपण संध्याकाळपर्यंत सभागृहात सादर करू, असे चॅलेंज दिले. तसेच या यादीवरही चर्चा करण्याचे आव्हान त्यांनी काँग्रेसला दिले.

वंदे मातरमवर चर्चेला सुरूवात झाली त्यावेळी प्रियांका गांधी यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधीही सभागृहात उपस्थित नसल्याचा मुद्दा काढत शहांनी काँग्रेसवर वार केला. प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान वंदे मातरमवर आता चर्चेची आवश्यक का आहे, असा प्रश्न करत त्यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा संदर्भ दिला होता. त्यावरून अमित शहांनी जवाहरलाल नेहरूंपासून आजच्या काँग्रेसपर्यंत वंदे मातरमला विरोध होत असल्याची टीका केली.

शहांच्या भाषणानंतर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी चर्चेत सहभाग घेतला. पंतप्रधानांवर टीका करताना ते म्हणाले, पंतप्रधानांनी १९३७ मध्ये नेहरूंवर मुळ वंदे मातरममधील काही ओळी हटविल्याचा आरोप केला. पण तुम्ही जेव्हा मुस्लिम लीगसोबत जात बंगलामध्ये सरकार बनविली, तेव्हा काय झाले होते? जेव्हा श्यामा प्रसाद मुखर्जी बंगालमध्ये सरकार बनविण्यासाठी सहभागी झाले होते, तेव्हा तुमची देशभक्ती कुठे होती, असे सवाल खर्गेंनी केले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT