Assembly Session Update : नाहीतर घरी बसावं लागेल! फडणवीसांचा विधानसभेतच पारा चढला, आपल्या ‘लाडक्या’ आमदाराला दिला खणखणीत इशारा...

Devendra Fadnavis angry : काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड यांनीही फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणावर सभागृहात बोलताना लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला होता.
Devendra Fadnavis in Assembly
Devendra Fadnavis in AssemblySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics live : विधानसभेमध्ये मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लाडक्या आमदारासह इतर आमदारांनाही चांगलेच झापले. तसेच घरी बसावं लागेल, असा इशाराही दिला. विधानसभेतील चर्चेदरम्यान सातत्याने लाडक्या बहिणीवर सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदारांकडे त्यांचा रोख होता. यामध्ये भाजपच्या आमदारांचाही समावेश आहे.

काय घडलं विधानसभेत?

भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सभागृहात अत्यंत पोटतिडकीने अवैध दारू विक्रीबाबतचा मुद्दा उचलून धरला. ते म्हणाले, मागील सरकारमध्ये एक आणि आता एक लक्षवेधी मांडली होती. आपल्या दालनामध्ये तीन बैठका झाल्या. त्यावर अजूनही कारवाई नाही. ग्रामीण भागातील प्रत्येक आमदाराचा हा विषय आहे. त्यांना रोज काय त्रास, होतोय हे त्यांना विचारा.

लाडक्या बहिणींबाबत आपण सतत बोलतो. लाडक्या बहिणींचे दु:ख काय असेल, तर अवैध दारूवर आळा घालावा, हे आहे. दुरूस्ती करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, आपण बैठक घेतली. आपण उत्पादन शुल्क, गृह विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला निर्देश दिले. अध्यक्षांनी निर्देश देऊनही काय होत नसेल तर हा चिंतेचा विषय आहे, असे सांगत पवार यांनी थेट फडणवीसांकडे असलेल्या गृह विभागाकडेही बोट दाखविले.

Devendra Fadnavis in Assembly
Lok Sabha session Live : लोकसभा अध्यक्षांनी नीलेश लंकेंना दोनदा सुनावले; तुम्ही जेवढे लांबलचक विचाराल, तेवढे मंत्रीही...

पवारांच्या या संतापवर फडणवीसांनी लगेचच प्रत्युत्तर दिले. तेही संतापाच्या स्वरात म्हणाले, सदस्यांना पुन्हा सांगतो. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावे लागले. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण-लाडकी बहीण. लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील. ती योजना सुरूच राहील. त्या योजनेची दुसऱ्या योजनांशी तुलना करता येत नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis in Assembly
Parliament Session Live : ये खाली बस रे, बंद कर! बजरंग सोनवणे थेट केंद्रीय मंत्र्यांना भिडले, सावंत बोलत असताना काय घडलं संसदेत?

त्याआधी काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड यांनीही फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणावर सभागृहात बोलताना लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला होता. लाडक्या बहिणींना 1500 रुपये नकोत, सुरक्षा द्या, असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता. त्यावरही फडणवीसांनी कोणत्याही गोष्टी लाडक्या बहीण योजनेला जोडू नका, असे सांगितले होते. त्यानंतर काही मिनिटांतच पवारांनीही लाडकी बहीणचा उल्लेख केल्याने फडणवीसांचा पारा चढला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com