

Parliament Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला मंगळवारी शांततेत सुरूवात झाली. लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यानंतर पहिला प्रश्न अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नीलेश लंके यांना विचारण्याची संधी मिळाली. त्यांनी अहिल्यानगरसह महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीबाबतचा प्रश्न उपस्थित केला. त्याला कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उत्तर दिले.
नीलेश लंके यांनी प्रश्न लिहून आणले होते. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत झालेला अवकाळी पाऊस व गारपिठीमुळे मोसंबी, संत्रा, लिंबू, कांदा, डाळिंब या पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. एनसीसीएफ व नाफेडमार्फत खरेदी कांद्याचेही सुमारे १०० ते १५० कोटी रुपयांचे देयक अद्याप अडकले आहे. परिणामी शेतकरी आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलत असल्याचे लंकेंनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
महाराष्ट्र सरकारने या नुकसानीचे पंचनामे करून महाराष्ट्र सरकारकडे अहवाल सादर केला आहे का, विशेष पॅकेज मंजूर केले आहे का, शेतकऱ्यांचे थकित पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे का, नसेल तर ते पैसे कधीपर्यंत जमा होतील, असे प्रश्न लंकेंनी उपस्थित केले. हे प्रश्न विचारत असतानाच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना लांबलचक प्रश्न न विचारण्याची तंबी दिली.
तुम्ही प्रश्न लिहून आणले असतील तर हरकत नाही. पण प्रश्न थोडक्यात लिहा, असे सूचना अध्यक्षांनी लंकेंना केली. त्यानंतर मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लंकेंच्या प्रश्नाला उत्तर दिले. मात्र, या उत्तरामध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारचा अहवाल किंवा विशेष पॅकेजबाबत भाष्य केले नाही. एसडीआरएफ, एनडीआरएफअंतर्गतच्या निधीतून सुरू असलेल्या मदतकार्यावरच ते बोलले. विविध योजनांसह संपूर्ण देशातील मदतीसह महाराष्ट्रबाबतची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
लंके यांनी पुन्हा एकदा त्यांना विमा योजना, मदतीबाबतचे तीन लांबलचक प्रश्न विचारले. त्यावर अध्यक्षांनीही लगेच तुम्ही जेवढे लांबलचक विचाराल, तेवढे लांबलचक उत्तर मत्री देतील, अशी फिरकी घेतली. त्यावर सभागृहात हशा पिकला. त्यानंतर मंत्री चौहान यांनी एक मिनिटात थोडक्यात उत्तर दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.