New Delhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्ला चढवला. काही मुठभर लोक जनतेने 80 वेळा नाकारल्यानंतरही संसदेच्या कामात अडथळ आणतात. आपल्या राजकीय स्वार्थासाठी काही लोकांनी आपल्या संसदेला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्याची टीका मोदींनी केली.
पंतप्रधान मोदींनी संसदेच्या अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हिवाळी अधिवेशन असल्याने वातावरणही थंड राहील. 2024 चा शेवट होत असून संपूर्ण देश उत्साहात 2025 च्या स्वागताची तयारी करत आहे. संसदेचे हे सत्र अनेकप्रकारे विशेष आहे. आपल्या संविधानाच्या यात्रेचे 75 व्या वर्षांत पदार्पण होत आहे. हा आपल्या लोकशाहीसाठी खूप महत्वाची संधी आहे.
नवीन खासदारांना संधी देण्याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या राजकीय स्वार्थासाठी दुर्दैवाने काही लोक संसदेला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जनतेने स्वीकारलेले नाही. मुठभर लोक हुल्लडबाजी करून संसदेला नियंत्रित करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. पण जेव्हा वेळ आली तेव्हा जनतेने त्यांना शिक्षा दिली आहे. अनेकांना संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही, अशी नाराजी मोदींनी व्यक्त केली.
संविधान निर्मात्यांनी संविधानाची निर्मिती करताना प्रत्येक मुद्द्यावर विस्ताराने चर्चा केली. त्यानंतर आपल्याला हे संविधान मिळाले. संसद त्याचा एक महत्वाचा हिस्सा आहे. संसदेत चांगल्याप्रकारे चर्चा व्हायला हवी. अधिकाधिक लोकांनी चर्चेमध्ये योगदान द्यायला हवे, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.
दरम्यान, मंगळवारी राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज होणार नाही. कारण त्यादिवशी संविधान सभेने संविधान स्वीकारले, त्याचे 75 वे वर्ष होतील. संविधान सभागृहात दोन्ही सभागृहातील सदस्य एकत्रित असतील. यादिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सदस्यांना मार्गदर्शन करतील.
संविधान दिनी काही महत्वाची कागदपत्रे पुस्तकातून प्रकाशित केली जातील. संविधान निर्मितीआधी काय-काय प्रक्रिया झाली होती, यांसह अनेक गोष्टींची माहिती यामध्ये असेल. हे सामान्य पुस्तक नाही. पुस्तकामध्ये असलेली चित्र, त्याचे वर्णन, मुलभूत संकल्पना, त्याची माहिती देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.