Ajit Pawar : टायमिंग जुळलं नाही; अजितदादा म्हणाले, 'नाहीतर पवारसाहेबांचे...'

Ajit Pawar statement on Sharad Pawar in Karad: महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी शरद पवार यांची भेट न झाल्यावरून अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया...
Ajit Pawar 1
Ajit Pawar 1Sarkarnama
Published on
Updated on

Satara News : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज कराड येथे आले होते. तत्पूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांचे नातू आमदार रोहित पवार, खासदार नीलेश लंके यांनी अभिवादन केले.

यानंतर आलेल्या अजित पवार यांनी टायमिंग जुळलं नाही, नाहीतर शरद पवारसाहेबांची आशीर्वाद घेतले, अशी मोठी प्रतिक्रिया दिली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर रोहित पवार कराडला आले होते. अजित पवार (Ajit Pawar) आणि रोहित पवार समोरासमोर आल्यानंतर अजितदादांनी रोहित पवार यांना समोर पाहून पाया पड काकाच्या, तू थोडक्यात वाचलास, मी सभा घेतली असती तर काय झाले असते? असा मिश्किल टोला लगावला. यानंतर अजितदादांनी या भेटीवर माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. यावेळी शरद पवारसाहेबांची भेट झाली असती, तर त्यांचे आशीर्वाद घेतले असते, असे सांगून यावर मोठी प्रतिक्रिया दिली.

Ajit Pawar 1
Ajit Pawar : काकांनी घेतली पुतण्याची फिरकी! रोहित, तू थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं...! VIDEO पाहा

अजितदादा म्हणाले, "पोलिसांनी गाडी दुसरीकडे वळवली. नाहीतर, लवकर आलो असतो, तर पवारसाहेबांचे (Sharad Pawar) देखील आशीर्वाद घेतले आहे. तसे हसन मुश्रीफ आणि माझ्या सहकाऱ्यांना बोललो होता. पण टायमिंग जुळलं नाही". यावरून मी पोलिसांवर चिडलो देखील, असेही अजित पवार यांनी म्हटले.

Ajit Pawar 1
Kardile Vs Tanpure : कर्डिले अन् तनपुरे समर्थकांमध्ये धुमश्चक्री; गोळीबार, चौघे जखमी

'आपल्याकडे वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घेण्याची पद्धत आहे. महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. समोरून वडिलधारे आले की आपण पाया पडतो. त्यानुसारच रोहित पवार यांना आशीर्वाद दिले. इथं पवारसाहेबांची भेट झाली असती, तर त्यांचे देखील आशीर्वाद घेतले असते. वडिलधारे म्हणून दर्शन मागितले असते. पण टायमिंग जुळलं नाही', असे अजित पवार यांनी म्हटले.

अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देताना म्हणाले, "महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांना कधीही विसरू शकत नाही. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार चव्हाणसाहेब आहेत. त्यांचेच विचार, आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सहकारी ठेवून पुढे जात आहोत". चव्हाणसाहेबांनी घालून दिलेल्या दिशेने पुढ जायचं आहे, एकत्र राहिले पाहिजे, पुरोगामी महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी प्रयत्न करायचे आहे, यासाठी अजित पवार यांनी विरोधकांनी एकत्र येण्याचे आव्हान केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com