Mumbai News: विधानसभा निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी घेत ज्येष्ठ नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिला आहे, ते राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.
नाना पटोले यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी असून राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून ते आज वरिष्ठांशी बोलून राजीनामा देण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी नाना पटोले यांना जबाबदार धरत अपयशाचे खापर त्यांच्या डोक्यावर फोडले आहे.
पटोलेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रस पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यानंतर पटोलेंनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त १६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या पराभवाने अनेक कारणे पुढे येत आहेत.
तिकीट देण्यास नाना पटोलेंनी उशीर केल्याचे प्रमुख कारण समोर येत आहेय काँग्रेसचा दारुण पराभवाला पटोले हेच जबाबदार असल्याचा सूर काँग्रेसच्या एका गटातील नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे समजते.
विधानसभेतील पराभवानंतर नाना पटोले हे तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. हायकमांडकडे पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र त्यावर पक्षाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आल्या नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.