New Delhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशानात अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी सोमवारी लोकसभेत राज्य व केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी यांनी येरे येरे पावसा, तुला देतो पैसा... या मराठीतील कवितेचा संदर्भ देत महायुती सरकारने लोकांना दिलेल्या आश्वासने पाळली नसल्याची टीका केली. महिलांपर्यंत चांगला पैसा पोहचवला, हे महायुतीच्या सरकारचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले.
विशाल पाटील यांनी पुरवणी मागण्यांवर बोलत असताना सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्रातील विजयाबद्दल सरकारचे अभिनंदन करताना विशाल पाटील म्हणाले, स्वाभाविक आहे की, त्यांनी निवडणुकीदरम्यान दिलेल्या नाऱ्यांमुळे विजय मिळाला, असे त्यांना वाटत असेल. एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, हे ते नारे होते. पण हे खरे नाही. त्यांनी महिलांपर्यंत चांगला पैसा पोहचवला, हे विजयाचे कारण असल्याचे पाटील यांनी सांगितले.
डबल इंजिनचे सरकार आल्यानंतर लोकांना पैसा दिला जाईल, असे लोकांना सांगण्यात आले. निवडणूक जिंकल्यानंतर मला असे वाटले की, महाराष्ट्राला खूप पैसा दिला जाईल. पण मराठीत आम्ही लहानपणी एक कविता गायचो, येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा! या लोकांनी पैसा दाखवून मतांचा पाऊस तर पाडला, पण मतं मिळताच पैसा काढून घेतला, अशी टीका पाटील यांनी केली.
महाराष्ट्राला यावेळी काही अपेक्षा होत्या, पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. खतांवर लागलेल्या जीएसटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. खतांच्या किंमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. हवा तेवढा फायदा होत नसल्याने शेतकरी नाराज असून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे, असा मुद्दा पाटील यांनी उपस्थित केला.
नरेंद्र मोदी पंतप्रधान नसताना त्यांनी म्हटले होते की, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी होऊ नये, महागाई वाढू नये, विकासदर कमी होऊ नये. आज ह्या तिन्ही गोष्टी होत आहेत. पण त्याकडे सरकार लक्ष देत नाही. उत्पादन क्षेत्राकडे लक्ष दिले जात नसल्याने हे होत आहे. मध्यमवर्गींच्या पाठीचा कणा मोडला आहे. अर्थव्यवस्थेवर सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे मतही पाटील यांनी व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.