Parliament Winter Session : सोनिया गांधींकडील 51 खोक्यांमध्ये कोणते गुपित? नेहरूंच्या ‘खास’ पत्रांवरून लोकसभेत हंगामा

Pandit Jawaharlal Nehru Lok Sabha PMML Rahul Gandhi Sonia Gandhi BJP : दिल्लीतील पंतप्रधान संग्रहालयाने राहुल गांधी यांना पत्र लिहून ही पक्ष परत देण्याची मागणी केली आहे.
Jawaharlal Nehru, Sonia Gandhi
Jawaharlal Nehru, Sonia GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची काही महत्वाची पत्रे 51 खोक्यांमध्ये सोनिया गांधी यांच्याकडे असल्याचा दावा केला जात आहे. दिल्लीतील पंतप्रधान संग्रहालयातील अधिकाऱ्यांनी हा दावा केला असून ती परत देण्याची मागणीही करण्यात आली आहे. संग्रहालयाच्या वतीने आधी सोनिया गांधी आणि आता राहुल गांधींना याबबात पत्र लिहिण्यात आले आहे.

पंतप्रधान संग्रहालय सोसायटीचे सदस्य रिजवान कादरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यावरून सोमवारी लोकसभेत हंगामा झाला. भाजपने हा मुद्दा उचलून धरत त्या पत्रांमध्ये काय आहे, हे देशाला समजायला हवे. त्यासाठी ही पत्र परत द्यायला हवीत, अशी मागणी भाजपने केली आहे.

Jawaharlal Nehru, Sonia Gandhi
Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख हत्येचे पडसाद थेट लोकसभेत; मोदी सरकार दखल घेणार?

दरम्यान, कादरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींना यूपीए सरकारच्या काळात 2008 मध्ये संग्रहालयातील काही पत्र 51 खोक्यांमध्ये देण्यात आली होती. जवाहरलाल नेहरू मेमोरियलने ही पत्रे 1971 मध्ये नेहरू मेमोरियल म्यूझियमला (आता पंतप्रधान संग्रहालय) दिली होती. हा ऐतिहासिक दस्तावेज आहे.

नेहरूंच्या खासगी पत्रांमध्ये त्यांनी एडविना माउंटबॅटन, अल्बर्ट आईनस्टाईन, जयप्रकाश नारायण, पद्मजा नायडू, विजया लक्ष्मी पंडित, अरुणा आसण अली, बाबू जगजीवन राम आणि गोविंद वल्लभ पंत यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांना लिहिलेल्या पत्रांचाही समावेश आहे. ही पत्रे परत द्यावीत, अशी विनंती राहुल गांधी यांना करण्यात आल्याचे कादरी यांनी सांगितले.

Jawaharlal Nehru, Sonia Gandhi
Dhananjay Chandrachud : माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मोठा गुन्हा केलाय; शिवसेना खासदाराने का केला आरोप?

सोनिया गांधीनांही याबाबत सप्टेंबर महिन्यात पत्र पाठवून विनंती करण्यात आली होती. पण त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने राहुल गांधींकडे विनंती करण्यात आल्याचेही कादरी यांनी सांगितले. कादरी यांच्या या दाव्यानंतर भाजपने सोमवारी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला.

भाजपचे खासदार संबित पात्रा म्हणाले, माजी पंतप्रधानांनी पत्रात काय लिहिले होते, याची माहिती देशाला जाणून घ्यायची आहे. घाईघाईत ही पत्र का नेण्यात आली. देशापासून काय लपवले जात आहे? ही पत्रे आता कुठे ठेवण्यात आली आहेत, असा सवालही पात्रा यांनी उपस्थित केला.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com