Kiren Rijiju, Sonia Gandhi Sarkarnama
देश

Rajya Sabha Session : राज्यसभेत केंद्रीय मंत्र्यांनी काढली विरोधकांची लायकी; सोनिया गांधींवर गंभीर आरोपानंतर जोरदार हंगामा

Rajya Sabha Heated Debate Over Sonia Gandhi Accusations : विरोधकांनी मंगळवारी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

Rajanand More

New Delhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारीही हंगामा सुरूच राहिला. राज्यसभेत सत्ताधारी भाजपने जॉर्ज सोरोज आणि काँग्रेसमधील लिंकचा मुद्दा उपस्थित केला. तसेच सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात दाखल अविश्वास प्रस्तावावरूनही जोरदार शरसंधान साधला. केंद्रीय मंत्र्यांनी विरोधकांची लायकी काढली. त्यामुळे मोठा गदारोळ झाला.

भारताच्या इतिहासात 72 वर्षानंतर एक शेतकऱ्याचा मुलगा उपराष्ट्रपती पदावर पोहचून या देशाची सेवा करत आहे. राज्यसभेचे सभापती म्हणून त्यांनी प्रतिष्ठा वाढवणारे काम केले आहे. पण विरोधक सुरूवातीपासून अध्यक्षांची प्रतिष्ठा ठेवत नाही. उपराष्ट्रपतींचे नाव घेत त्यांच्यावर नको ते आरोप करत आहेत. तुम्ही या सभागृहाचे सदस्य होण्याच्या लायक नाही, असे म्हणत रिजिजू यांनी विरोधी सदस्यांची लायकी काढली.

तुम्ही अध्यक्षांना सन्मान करू शकत नसाल तर या सभागृहाचे सदस्य होण्याचा तुम्हाला अधिकार नाही. उपराष्ट्रपतींचे पद आणि प्रतिष्ठेवर तुम्ही हल्ला करणार असाल तर आम्ही त्याचा बचाव करू. तुमचा हेतू आम्ही साध्य होऊ देणार नाही, असे सांगत रिजिजू यांनी थेट सोनिया गांधी यांचे नाव घेतले.

सोनिया गांधी आणि जॉर्ज सोरोस यांची लिंक आज समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय जगतात याबाबचा रिपोर्ट आहे. काँग्रेसचे नेतृत्व आणि सोरोसची लिंक आहे. जे जॉर्ज सोरोस बोलतो तेच तुम्ही देशात तीच भाषा करता. याची तुम्हाला लाज वाटायला हवी. तुम्ही भारताच्या विरोधकांसोबत उभे राहता. तुम्ही भारताला नुकसान पोहचवणाऱ्यासोबत उभे राहता. काँग्रेस आणि जॉर्ज सोरोसमध्ये काय नाते आहे, हे सांगा आणि देशाची माफी मागा, असा हल्लाबोलही रिजिजू यांनी चढवला.

उपराष्ट्रपतींविरोधात विरोधकांनी दिलेल्या अविश्वास प्रस्तावावरून रिजिजू चांगले भडकले. ते म्हणाले, जगदीप धनखड यांनी नेहमी शेतकरी, गरिबांची भाषा बोलली आहे. आम्हाला त्यांचा गर्व आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात नोटीस देण्याचे नाटक आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे रिजिजू म्हणाले.

दुपारी बारा वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनीही पुन्हा सोरोसचा मुद्दा उपस्थित केला. सोनिया गांधी आणि सोरोस यांच्यात काय कनेक्शन आहे, असा सवाल त्यांनी केला. हा मुद्दा भटकवण्यासाठी सभापतींवर आक्षेप घेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे.

सोरोस हा देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी धोका असून काँग्रेस त्याचे साधन बनत असल्याचा आरोप नड्डा यांनी केला. सभापतींवर केलेल्या आरोपांचा निषेधही नड्डा यांनी केला. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT