Delhi Assembly Elections : काँग्रेसला आणखी एक धक्का; अरविंद केजरीवालांची दिल्ली निवडणुकीबाबत 'ही' मोठी घोषणा

Arvind Kejriwal Big Announcement for Delhi Elections : दिल्ली विधानसभा निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणार असून, आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक स्वबळावर लढवत सत्तेची हॅटट्रिक साधण्यासाठी रणनीती आखली आहे.
Arvind Kejriwal | Rahul Gandhi
Arvind Kejriwal | Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : दिल्लीतील विधानसभा निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होत आहेच. त्यामुळे दिल्लीतील राजकीय घडामोंडीना वेग आलाय. दिल्लीत गेली दोन टर्म अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची सत्ता आहे. आता सत्तेच्या हॅटट्रिकच्या तयारी अरविंद केजरीवाल आहेत.

त्यामुळे तिथं कोठेही तडजोड करण्याची त्यांनी तयारी नाही. केजरीवाल, मनीष सिसोदिया या आपच्या दिग्गज नेत्यांना केंद्रीय यंत्रणेनी केलेली अटकेमुळे आप दिल्लीच्या निवडणुकीला इंडिया आघाडी म्हणून समोरे जाईल, असे वाटत होते. परंतु अरविंद केजरीवाल यांनी स्वबळाचा नारा दिला. यामुळे इंडिया आघाडीत फूट पडली असून, यात सर्वात मोठा धक्का काँग्रेसला बसला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप युतीचा पराभवासाठी देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. विधानसभा निवडणुकांमध्ये या इंडिया आघाडीला तडे जाऊ लागले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होत आहेत.

या निडवणुकीला समोरे जाण्यासाठी काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्षात आघाडीची चर्चा सुरू होती. परंतु आपचे संयोजक नेते माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीला स्वबळावर समोरे जाण्याची घोषणा केली. याचबरोब काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम दिला. अरविंद केजरीवाल यांची या भूमिकेमुळे काँग्रेसला धक्का बसला असून, इंडिया आघाडीला भविष्याबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित झाले आहेत.

Arvind Kejriwal | Rahul Gandhi
BJP National President Election : भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत 'ही' दोन तरुण चेहरे; विनोद तावडे पडले मागे?

अरविंद केजरीवाल यांनी याबाबत समाज माध्यमांवर पोस्ट शेअर केली आहे. आम आदमी पक्ष (AAP) दिल्लीतील निवडणूक स्वबळावर लढणार आहे. काँग्रेससोबत कुठल्याही आघाडीची शक्यता नाही. दरम्यान, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात होती.

15 जागा काँग्रेस आणि 1-2 जागा इंडिया आघाडीतील अन्य पक्षांना दिल्या जातील. उर्वरीत जागांवर आम आदमी पक्ष, त्यांचे उमेदवार उभे करतील, अशा चर्चा होत्या. परंतु या सर्व चर्चा अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून फेटाळल्या आहेत.

Arvind Kejriwal | Rahul Gandhi
UPSC Mains Exam Result Declared : 'UPSC'ने जाहीर केला मुख्य परीक्षेचा निकाल; उमेदवारांना 'या' ठिकाणी बघता येणार

आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरवात केली आहे. दुसऱ्या यादीत 20 उमेदवारांच्या नावाचा घोषणा केली आहे. यावेळी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा मतदारसंघ बदलला आहे. सिसोदिया हे पटपडगंज ऐवजी जंगपुरा मतदार संघातून विधानसभेसाठी मैदानात उतरवण्यात आले आहे. आपमध्ये प्रवेश घेतलेले अवध ओझा यांना पटपडगंज येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

याशिवाय आम आदमी पक्षाने नरेलातून दिनेश भारद्वाज, तिमारपूरमध्ये सुरेंद्रपाल सिंह बिट्टू, आदर्शनगर मतदारसंघात मुकेश गोयल, मुंडकात जसबीर कारला, मंगोलपुरीतून राकेश जाटव धर्मरक्षक, रोहिणीतून प्रदीप मित्तल, चांदनी चौकातून पुनरदीप सिंग साहनी, पटेलनगरमधून प्रवेश रतन, मादीपुरातून राखी बिर्ला, जनकपुरीतून प्रवीण कुमार, बिजवासनमधून सुरेंद्र भारद्वाज, पालम मतदारसंघातून जोगिंदर सोलंकी, जंगपुरातून मनिष सिसोदिया यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com