Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी राजधानी लखनऊ इथं भारत-पाकिस्तान फाळणी निमित्त आयोजित मौन मोर्चामध्ये सहभाग नोंदवला. सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा हातात घेऊन लोकभवनपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी भाषण करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. तसंच जर मोदी हे भारताच्या स्वातंत्र्यावेळी पंतप्रधान असते तर भारताची फाळणी झाली नसती असं त्यांनी म्हटलं आहे.
योगी आदित्यनाथ यांनी यावेळी देशाच्या फाळणीसाठी आणि त्यावेळच्या नरसंहारासाठी काँग्रेसला जबाबदार धरत टीकाही केली. त्यांनी म्हटलं की, "हे तेच लोक आहेत ज्यांनी १९४७ मध्ये देशाची फाळणी आणि त्यानंतर झालेल्या नरसंहारासाठी प्रत्यक्षात जबाबदार आहेत. जर त्यावेळी नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान असते तर भारताला कोणीही जरासही नुकसान पोहोचवू शकलं नसतं. देशाला काँग्रेसच्या भेकडपणाची मोठी किंमत चुकवावी लागली. सीएए विरोधी आंदोलनावेळी आपण हा प्रकार पाहिलाच आहे"
देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळालं, पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की, जी जमीन पाकिस्तान समर्थकांनी मागितलीच नव्हती ती पंजाबची आणि बंगालची जमीन पाकिस्तानला जबरदस्तीनं दिली गेली. त्याचबरोबर सिंध हा एक हिंदू बहुल भाग आणि सिंधी समाजाचा दबदबा असलेला भाग होता. तो देखील जबरदस्तीनं पाकिस्तानला आंदण देण्यात आला. सर्व हिंदू गावं जबरदस्तीनं बांगलादेशाला देण्यात आले.
सत्तेसाठी उतावीळ झालेल्या काँग्रेसनं ही लाजीरवाणी गोष्ट केली, ज्यांच्यावर देशानं भरवसा केला होता. या भरवशाचा बदला त्यांनी धोका देऊन दिला. आदित्यनाथ पुढे हे देखील म्हणाले की, जे लोक १९४७ मध्ये गप्प बसले, त्यांचा आवाज तेव्हाही चढला नाही, कारण त्यांची नजर केवळ सत्तेवर होती. त्यांनी देशाची किंमत देत सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला, तसंच आजही त्यांची काम अशीच आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.