J P Nadda Health Update: केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड; एम्समध्ये दाखल

केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यामुळं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.
J. P. Nadda
J. P. NaddaSarkarnama
Published on
Updated on

J P Nadda Health Update: केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यामुळं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे, इथं त्यांच्यावर कार्डिऑलॉजी विभागात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयानं एक निवेदन देखील प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये त्यांनी नड्डा यांच्यावर कुठले उपचार केले जात आहेत याची माहिती देण्यात आली आहे.

६५ वर्षीय नड्डा यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर कार्डिओलॉजी विभागात डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली उपचार सुरु आहेत. दिल्ली एम्सनं नड्डा यांच्या प्रकृतीबाबत बोलताना सांगितलं की, जेपी नड्डा यांना १३ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळ त्यांची तपासणी केली गेली. यामध्ये कोरोनरी अँजिओग्राफीसह इतर अनेक चाचण्या करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना कार्डिऑलॉजी विभागात डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.

गुरुवारी फडकावला होता तिरंगा दरम्यान, आरोग्य मंत्री नड्डा यांनी १३ ऑगस्ट रोजी आपल्या घरी कुटुंबिायांसह तिरंगा फडकावला होता. ट्विटरवर त्यांनी याचे फोटो देखील शेअर केले होते. तसंच देशवासियांना हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचं आवाहनही केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com