Sharad Pawar, Sanjay Raut
Sharad Pawar, Sanjay Raut Sarkarnama
देश

Sharad Pawar News : पवारांनी अदानींना क्लीन चिट दिलेली नाही, तर...; राऊतांनी स्पष्टच सांगितलं

सरकारनामा ब्युरो

Sharad Pawar and Opposition Leaders : काँग्रेस नेते, माजी खासदार राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंधावरून लोकसभेत काही प्रश्न उपस्थित केले होते. तोच धागा पकडून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी अदानी घोटाळ्याप्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी)ची स्थापना करण्याची मागणी केली. त्यामुळे अधिवेशनातील कामकाज तहकूब केल्याने बहुतांश वेळ वाया गेला. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी जेपीसीबाबत वेगळी भूमिका मांडली.

हिंडनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या उद्योग समुहावर विरोधाकांकडून अनेक आरोप करण्यात आले आहे. त्यावर खासदार शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, "मी हिंडनबर्ग कंपनीचे नाव कधी ऐकलेले नाही. त्या कंपनीच्या अहवालात अदानींना लक्ष्य करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनंतर आता संयुक्त संसदीय समितीच्या नियुक्तीची (जेपीसी JPC) आवश्यकता राहिली नाही. जेपीसीमध्ये २१ पैकी १५ सदस्य हे सत्ताधारी पक्षाचे आहेत. यात सत्ताधारी अधिक आहेत. त्यामुळे तेथे संशय निर्माण होऊ शकतो.पण माझा त्याला सरसकट विरोध नाही.जोपीसीपेक्षा न्यायालयाची समिती अधिक विश्वसनीय आहे."

दरम्यान, विरोधकांताली २० पक्षांपैकी १९ पक्षांनी जेपीसीची मागणी योग्य असल्याचे काँग्रेस (Congress) पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. यामुळे विरोधकांत फूट पडते की काय, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जेपीसीच्या मागणीवर विरोधक कायम आहेत, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत सावरकर विषयानंतर पुन्हा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यावर खासदार राऊत यांनी उत्तर दिले आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले, "तो फक्त अदानींच्या चौकशीचा विषय नव्हता. त्यात महागाई, बेरोजगारी आदी मुद्देही होते. त्यामुळे सभागृह चालले नाही. त्यावेळी तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्वतंत्र होती. मात्र आमची आघाडी कालही होती आणि आजही आहे. शरद पवार यांनी जेपीसीच्या मागणीवर वेगळी भूमिका घेतली असली तरी महाविकास आघाडीत मतभेत नाहीत. आघाडीला तडे जाणार नाहीत. पवार यांनी अदानींना क्लीन चिट दिली नाही. त्यांच्या चौकशीच्या पर्यायाबाबत ते बोलले आहेत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT