Gulabrao Ghorpade Passed Away : काँग्रेसचे सरचिटणीस गुलाबराव घोरपडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

घोरपडे यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद दहा वर्ष भूषवले.
Gulabrao Ghorpade
Gulabrao Ghorpade Sarkarnama

कोल्हापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे (Congress) सरचिटणीस तथा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष ॲड. गुलाबराव घोरपडे (वय ७८) यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. (Congress General Secretary Gulabrao Ghorpade passed away)

ॲड. गुलाबराव घोरपडे यांना तीन दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या त्रासामुळे कोल्हापूर येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, शुक्रवारी रात्री पुन्हा त्यांना हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

Gulabrao Ghorpade
Ashish Deshmukh News : काँग्रेसने नोटीस दिलेले आशिष देशमुख मुंबईहून थेट नागपूरला जाण्याऐवजी पुण्याला का गेले?

गुलाबराव घोरपडे हे सध्या मूळ माद्याळ (ता. कागल) येथील महावीर महाविद्यालय परिसरात राहत होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशीरा आमदार सतेज पाटील, आमदार ऋतूराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, राजेश लाटकर, तौफिक मुल्लाणी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी दवाखाना परिसरात गर्दी केली होती. घोरपडे यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्टिपटलमध्ये ठेवण्यात आले होते.

काँग्रेसमधील केंद्रीय तसेच राज्यस्तरावरील अनेक नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते. आमदार सतेज पाटील यांच्यासमवेत अलीकडे ते काम करत होते. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित सत्याग्रह आंदोलनात ते सहभागी झाले होते.

Gulabrao Ghorpade
Deshmukh Vs Patole : पटोलेंनी विधानसभेचे अध्यक्षपद कोणालाही न विचारता संशयास्पदरित्या सोडले : आशिष देशमुखांना पुन्हा हल्लाबोल

काँग्रेसने निष्ठावान कार्यकर्ता गमावला : नाना पटोलेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. गुलाबराव घोरपडे यांचे निधन अत्यंत धक्कादायक व मनाला वेदना देणारी घटना आहे. घोरपडे हे काँग्रेस विचारांचे पाईक होते, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेसचा विचार सोडला नाही. घोरपडे यांच्या निधनाने काँग्रेसने एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला आहे, अशा शोकभावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

Gulabrao Ghorpade
Karnataka Assembly Election : ‘शिवकुमारांनी माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त केली’: दुसरी यादी जाहीर होताच काँग्रेसमध्ये उफाळली बंडखोरी

ॲड. घोपरडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. मननिळावू स्वभाव, दांगडा जनसंपर्क व जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर असणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. घोरपडे यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद दहा वर्ष भूषवले, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निरीक्षक अशा विविध पदांवर ते कार्यरत होते. त्यांच्या अकाली जाण्याने कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच काँग्रेस कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com