Ambadas Danve On Ayodhya News : बाळासाहेबांच्या देव्हाऱ्यातून चोरलेला बाण रामाचा होवूच शकत नाही...

Marathwada : प्रभु रामांचे भव्य मंदिर तिथे आता साकारले जात आहे. त्यामुळे तिथे जावून नाटक करण्यात काहीच अर्थ नाही.
Ambadas Danve- CM Eknath Shinde News
Ambadas Danve- CM Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या देव्हाऱ्यातून चोरलेला धनुष्यबाण रामाचा होवूच शकत नाही. त्यामुळे जे चोरलेला धनुष्यबाण आयोध्येत घेवून जात आहेत, तो रावणाचा आहे, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर केली आहे.

Ambadas Danve- CM Eknath Shinde News
Imtiaz jalil Letter To PM News : इम्तियाज जलील यांना शोधायचंय दंगली मागचं सत्य..

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी `पहिले मंदीर फिर सरकार`, अशी घोषणा अयोध्येतच दिली होती. आता तिथे राम मंदिर देखील उभारले जात आहे, त्यामुळे आता अयोध्येत जाण्यात काय मर्दुमकी? असा टोला देखील दानवे यांनी लगावला. (Eknath Shinde) एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत आमदार, खासदार शेकडो शिवसैनिक अयोध्येत दाखल होत आहेत. तिकडे जोरदार तयारी सुरू आहे, तर इकडे या दौऱ्यावर विरोधकांकडून टीकेचे बाण सोडले जात आहेत.

अंबादास दानवे या दौऱ्याबद्दल भाष्य करतांना म्हणाले, बंडखोरी करून शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण या लोकांनी चोरला. या चोरलेल्या धनुष्यबाणाची अयोध्येत जावून पुजन करण्यात काय मर्दुमकी आहे. उध्दव ठाकरेंनी अयोध्येत जाऊन `पाहिले मंदिर फिर सरकार`, अशी घोषणा केली होती.

प्रभु रामांचे भव्य मंदिर तिथे आता साकारले जात आहे. त्यामुळे तिथे जावून नाटक करण्यात काहीच अर्थ नाही. आता हे लोक शरयु नदीत जातील किंवा गंगेत याने काही फरक पडणार नाही. या दोन्ही नद्या पवित्र आहेत, उलट यांच्या जाण्याने अपवित्र होतील, असा टोला देखील दानवे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com