Petrol diesel cheaper latest update Sarkarnama
देश

Petrol diesel rate drop : पेट्रोल-डिझेल थेट 6 रुपयांनी स्वस्त! 'या' देशाच्या सरकारने घेतला मोठा निर्णय!

Petrol diesel cheaper latest update : सरकारच्या मोठ्या निर्णयानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट 6 रुपयांची कपात करण्यात आली आहे. कोणत्या देशाने घेतला हा निर्णय आणि याचा सामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार जाणून घ्या.

Rashmi Mane

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी चढ-उतार सुरू असताना पाकिस्तान सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोल आणि हाय-स्पीड डिझेलच्या दरात मोठी कपात जाहीर केली असून पेट्रोल तब्बल 6 रुपयांनी तर डिझेल 6.80 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. नव्या दरांची अंमलबजावणी 23 मेपासून सुरू झाली आहे.

सरकारच्या नव्या निर्णयानंतर पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर आता 403.78 रुपये प्रति लिटर झाला असून हाय-स्पीड डिझेल 402.78 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात इंधन दर कमी करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. याआधीही सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 5 रुपयांची कपात केली होती.

पेट्रोलचा वापर मुख्यतः दुचाकी, खासगी कार, रिक्षा आणि छोट्या वाहनांमध्ये केला जातो. त्यामुळे या दरकपातीचा थेट फायदा मध्यमवर्गीय आणि रोजच्या प्रवासासाठी वाहन वापरणाऱ्या नागरिकांना होणार आहे. दुसरीकडे डिझेलचा वापर मालवाहतूक, ट्रक, बस आणि मोठ्या जनरेटरमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याने वाहतूक क्षेत्रालाही याचा फायदा मिळणार आहे.

मात्र काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये इंधनाच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठला होता. इराण-अमेरिका आणि इस्रायलमधील तणाव वाढल्यानंतर मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 55 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर एप्रिलमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ जाहीर झाली होती.

दरम्यान, पाकिस्तान सरकार दर शुक्रवारी इंधन दरांचा आढावा घेत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या हालचालींनुसार दर बदलले जात असून त्यामुळे नागरिकांना कधी वाढ तर कधी दिलासा अनुभवायला मिळत आहे. भारतातही कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा परिणाम दिसून येत असून पेट्रोल-डिझेलच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT