Collector suspension : भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणी बड्या सनदी अधिकाऱ्याचे अखेर निलंबन

भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणातील चौकशी, सरकारी कारवाई आणि संपूर्ण अपडेट्स जाणून घ्या.
Avinash Pathav
Avinash Pathav Sarkarnama
Published on
Updated on

Beed news: बनावट लवाद आदेशाने 68 कोटी रुपयांचा भूसंपादन मावेजा 310 कोटी रुपयांवर नेऊन 241 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या वरिष्ठ सनदी अधिकारी व तत्कालिन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यावर शासनाने निलंबनाची कारवाई केली.

बीडला जिल्हाधिकारी असलेल्या अविनाश पाठक यांच्या बनावट स्वाक्षऱ्या, पदनाम वापरुन ता. 1 मार्च ते 17 एप्रिल 2025 या कालावधीत 154 लवाद आदेशाने 241 कोटी रुपयांची फसवणूक केल्यावरुन नोव्हेंबर 2025 मध्ये शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Avinash Pathav
Sunil Shelke News: सुनील शेळकेंना मिळणार ‘लाल दिवा’; कोणते खाते मिळणार?

मात्र, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या भारतीय पोलिस सेवेतील परिविक्षाधिन अधिकारी व बीडचे उपविभागीय अधिकारी वेंकटरमण यांनी तांत्रिक तपासात या स्वाक्षऱ्यांची फॉरेन्सिककडून तपासणी केली असता या आदेशांवरील स्वाक्षऱ्या अविनाश पाठक यांच्या असल्याने स्पष्ट झाल्याने 7 मे रोजी पाठकला लातूरच्या घरातून ताब्यात घेत शिवाजी नगर पोलिस ठाण्यात अटक केली.

सुरुवातीला आठ दिवसांच्या पेालिस कोठडीनंतर आता पाठक 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत येथील जिल्हा कारागृहात आहे. दरम्यान, शुक्रवारी शासनाने अविनाश पाठकच्या निलंबनाचे आदेश दिले असून अटकेच्या दिवशी म्हणजेच 7 पासून हे निलंबन असल्याचे आदेशात म्हटले आहे.

Avinash Pathav
Onion Prices Crash : कांद्याला 1 रुपया किलो भाव; शेतकरी संतप्त , जमिनी पंतप्रधानांच्या नावावर करून देण्याचा इशारा

विभागीय पाठकला बीड मुख्यालय देण्यात आले आहे. बीडला मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यानंतर येथेच जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत पाठकची मागच्या वर्षी मत्स विभागात बदली झाली होती. त्यानंतर पाठक नियुक्तीच्या प्रतिक्षेत होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com