Tahsildar Rakesh Gidde news : तहसीलदार राकेश गिड्डेंच्या कुटुंबासाठी मोठा निर्णय, अपघाती निधनाच्या दोन महिन्यातच पत्नी सरकारी कर्मचारी!

Tehsildar rakesh gidde wife job : तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या दोन महिन्यांत त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. जाणून घ्या संपूर्ण बातमी.
Beed News: Late Tehsildar Rakesh Gidde’s Wife Gets Government Job in Sangli
Beed News: Late Tehsildar Rakesh Gidde’s Wife Gets Government Job in SangliSarkarnama
Published on
Updated on

Marathwada news : केजचे दिवंगत तहसिलदार राकेश गिड्डे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना प्रशासनाचा पाठपुरावा आणि शासनाकडून सकारात्मक प्रतिसादामुळे दिलासा देणारी बाब घडली आहे. त्यांच्या पत्नी नेहा गिड्डे यांना खास बाब म्हणून अनुकंपा तत्वावर सांगली जिल्ह्यात नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

खुद्द महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाचे आदेश सोशल मिडीयावरुन जाहीर केले. 9 एप्रिल रोजी राकेश गिड्डे यांचा रेणापूर (जि. लातूर) येथे वाहन अपघातात मृत्यू झाला. सामान्यांसाठी चिखल तुडवणारा अधिकारी अशी त्यांची ओळख हेाती. दरम्यान, त्यांच्या पश्‍चात त्यांच्या पत्नी नेहा यांना अनुकंपा तत्वावर खास बाब म्हणून त्यांच्या स्वजिल्ह्यात नोकरीचा निर्णय जाहीर करण्यात आला.

Beed News: Late Tehsildar Rakesh Gidde’s Wife Gets Government Job in Sangli
Collector suspension over land scam : भूसंपादन घोटाळा प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांचे निलंबन; काय आहे नेमके प्रकरण?

जिल्हाधिकाऱ्यांचा पाठपुरावा

दरम्यान, एखादा अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटूंबातील एकाला अनुकंपा तत्वावर त्याच अस्थापनेत नोकरी दिली जाते. त्यासाठीही जेष्ठता यादी व इतर तांत्रिक प्रक्रीयेत दोन - चार वर्षांचा काळ सरतो. मात्र, दिड वर्षांची मुलगी व असा प्रकार घडल्याने त्यांच्या पत्नी नेहा यांना बीडपेक्षा त्यांचे सासर व माहेर सांगली असल्याने त्यांना तेथे नोकरी सोयीची ठरेल म्हणून स्वत:जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शासनाकडे विनंती करुन तसा प्रस्ताव पाठवला.

मंत्री बावनकुळे यांनीही खास बाब म्हणून मान्यता दिली. दरम्यान, गुरुवारी नेहा गिड्डे शासकीय तांत्रिक बाबींच्या पुर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, लेखाधिकारी श्रीकांत कुलकर्णी आणि लेखा शाखेच्या गोदावरी नागरगाजे यांनी सर्व तांत्रिक बाबी आत्मीयतेने समजावून सांगत मोठा दिलासा दिला.

Beed News: Late Tehsildar Rakesh Gidde’s Wife Gets Government Job in Sangli
Census Duty : जनगणना कामावर हायकोर्टाचा मोठा दणका! खासगी शाळांच्या शिक्षकांना सक्ती नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क महत्त्वाचा

उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनीही आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी वैयक्तिक पातळीवर सहकार्य करण्याची तयारी दर्शवत आपुलकीचा परिचय दिला.

‘बाबांचा मोबाईल’ सर्वच हाळहळे

दरम्यान, नेहा गिड्डे मुलगी राही व नातेवाईकांसह तांत्रिक बाबींच्या पुर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय व केज तहसिलमध्ये गेल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात चिमुकली राही हातात मोबाईल घेऊन खेळत असताना बाबांचा मोबाईल म्हणत होती. बाबा या जगात नसल्याची पुसटशीही जाणिव चिमुकलीला नव्हती. हे निरागस बोल आणि तिचे बागडणे पाहून उपस्थित हाळहाळले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com