New Delhi News : आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. देशभरात नागरिकत्व सुधारणा (CAA) कायदा लागू केल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकते. याचदरम्यान, मोदी सरकारने (Modi Government) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारकडून गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर दोन रुपयांनी कमी केले आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून हे नवे दर लागू केले जाणार आहेत.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांची कपात करून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, कोट्यवधी भारतीयांच्या आपल्या कुटुंबाची सुविधा आणि त्यांचे हित जपणे त्यांचे लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणूक होणार असल्याने केंद्र सरकार जनतेला दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहे. देशात लवकरच पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. या वेळी पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Prices deduction) प्रतिलिटर 6 ते 10 रुपयांनी कपात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महागाईने त्रस्त असलेल्या सामान्यांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून दर कमी करण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांमध्ये चर्चा सुरू होती. मोदी सरकारच्या या घोषणेनंतर आता महाराष्ट्रात महायुती सरकारकडूनही पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा किंवा पेट्रोल-डिझेलच्या व्हॅट कमी करण्याची घोषणा होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. तसेच त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांवर विधानसभेची निवडणूक आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.