Modi Government News : जो कहाँ, वो किया! मोदींनी ‘ही’ तीन मोठी आश्वासनं केली पूर्ण...

CAA Rules : मोदी सरकारने सोमवारी देशभरात सीएए कायदा लागू केला. या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर भाजपने निवडणुकीआधी मोठा डाव टाकल्याचे बोलले जात आहे.
PM Narendra Modi, Amit Shah
PM Narendra Modi, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यासाठी काही दिवस बाकी असताना मोदी सरकारने (Modi Government News) मोठी खेळी खेळली आहे. सरकारने काल देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला आणि मतदारांना निवडणुकीआधी एक मोठा संदेश दिला आहे. मोदी सरकारने निवडणुकीआधी आपली तीन आश्वासने पूर्ण करत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे पडसादही आता उमटू लागले आहेत.

सीएए कायदा (CAA rules) लागू करणार असल्याचे भाजपकडून (BJP) 2019 पासूनच सांगितले जात होते. यावर्षी कायद्याला राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले होते. पण त्याला असलेल्या विरोधामुळे त्याच्या अंमलबजावणीसाठी पाच वर्षे जावी लागली. पण असे असले तरी निवडणुकीआधी (Lok Sabha Election 2024) कायदा लागू करून भाजपने आपले मोठे आश्वासन पूर्णत्वास नेले आहे.

PM Narendra Modi, Amit Shah
Haryana Political News : आघाडीतून बाहेर पडलेल्या पक्षालाच भाजपने फोडले? दहापैकी पाच आमदार गायब...

भाजपने पूर्ण केलेले पहिले मोठे आश्वासन म्हणजे जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवणे. मोदी सरकारने 2019 मध्येच हे कलम हटवण्याचा निर्णय घेत पहिले आश्वासन पूर्ण केले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात शिक्कामोर्तब केल्याने सरकारला बळ मिळाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राम मंदिराची (Ram Mandir) उभारणी ही आणखी एक आश्वासन. अय़ोध्येत (Ayodhya) २२ जानेवारीला राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिराची आश्वासनपूर्ती करत मोदी सरकारने निवडणुकीआधीच विरोधकांना झटका दिला. काँग्रेससह (Congress) काही विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. त्यावरून बरंच राजकारणही झालं.

मोदी सरकार ही तीन मोठी आश्वासने पूर्ण केल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. निवडणुकीच्या प्रचार ही तीन आश्वासने पूर्ण केल्याचा मुद्दा भाजपकडून प्रकर्षाने मांडला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना याबाबत दिले आहेत. त्यांनी या तिन्ही मुद्द्यांवरून काँग्रेससह विरोधकांवर जोरदार टीका केली.   

R

PM Narendra Modi, Amit Shah
CAA News : मी राजीनामा देईन, जर..! भाजपच्या आणखी एका मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com