PhD student Jean Joseph refusing to receive her doctorate from Tamil Nadu Governor RN Ravi during the Manonmaniam Sundaranar University convocation.  Sarkarnama
देश

Governor viral video : विद्यार्थिनी स्टेजवरच थेट राज्यपालांना भिडली, पदवी घेण्यास नकार; म्हणाली, ते राज्यविरोधी...

PhD Student Rejects Degree from TN Governor RN Ravi : तमिळनाडूतील मनोनमानियम सुंदरनर विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात हा प्रकार घडला आहे. जीन जोसेफ या पीएचडी स्कॉलर विद्यार्थिनीने राज्यपालांच्या हातून पदवी स्वीकारण्यास नकार दिला आहे.

Rajanand More

Political and Social Reactions to the Convocation Incident : कोणत्याही विद्यापीठाची कोणतीही पदवी असो, ती राज्यपालांच्या हस्ते मिळणार असेल तर विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहचलेली असते. राज्यपालांच्या हातून पदवी स्वीकारण्यास ते आतूर असतात. पण बुधवारी एक धक्कादायक प्रकार घडला. एका पीएचडी स्कॉलर विद्यार्थिनीने राज्यपालांच्या हातून पदवी स्वीकारण्यास स्टेजवरच नकार दिला. तिने शेजारी उभ्या असलेल्या कुलगुरूंच्या हातून पदवी स्वीकारली अन् त्यांच्यासोबत फोटोही काढला.

जीन जोसेफ असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. तमिळनाडूतील मनोनमानियम सुंदरनर विद्यापीठाचा 32 वा पदवी प्रदान सोहळा बुधवारी पार पडला. त्यासाठी राज्यपाल आर. एन. रवी हे प्रमुख पाहुणे होते. काही विद्यार्थ्यांना त्यांच्या हातून पदवी प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हातात पदवी प्रमाणपत्र आधीच देण्यात आली होती. त्यांना एकामागोमाग स्टेजवर येत राज्यपालांच्या हाता पदवी प्रमाणपत्र देत फोटो काढून पुढे जायचे होते.

एक-एक विद्यार्थी राज्यपालांसोबत फोटो काढून पुढे जात होते. जीन जोसेफ ही विद्यार्थिनी रांगेतून पुढे आल्यानंतर राज्यपालांकडे न जाता थेट शेजारी उभ्या असलेल्या कुलगुरूंकडे गेली आणि त्यांच्यात हाता पदवी प्रमाणपत्र देत फोटो काढण्यासाठी पोझ दिली. तिच्या या कृतीने राजपाल रवी यांच्यासह सगळेच गोंधळात पडले. राज्यपाल आणि तिच्यामध्ये काही सेकंद संवाद झाला. पण कुलगुरूंसोबत फोटो काढल्यानंतर ती निघून गेली. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  

विद्यार्थिनीच्या या कृतीमुळे कार्यक्रमातील सगलेच अवाक झाले. तिच्या या कृतीने खसखस पिकली. त्यानंतर जीन जोसेफ हिने आपल्या कृतीचे समर्थन करत त्यामागचे कारण सांगितले. मीडियाशी बोलताना ती म्हणाली, आर. एन. रवी हे तमिळनाडू आणि येथील लोकांच्या विरोधात आहेत. तमिळ लोकांसाठी त्यांनी काहीही केलेले नाही. त्यांच्याकडून मला पदवी स्वीकारायची नव्हती.  

दरम्यान, जीन जोसेफ हिचा पती रंजन हा सत्ताधारी डीएमके पक्षाचा पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या डीएमके सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये सातत्याने वाद समोर येत आहेत. राज्यपालांकडून जाणीवपूर्वक महत्वपूर्व विधेयके मंजूर करण्यास विलंब केला जात असल्याचा आरोप डीएमकेकडून केला जातो. राज्यपाल समांतर प्रशासन चालवत असून निवडून आलेल्या सरकारमध्ये अडथळे आणत असल्याची टीकाही सरकारकडून केली जाते. राज्यपाल विरुध्द सरकार हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT