Air Marshal Sujeet Dharkhar Sarkarnama
देश

Fact Check : युध्दास विरोधामुळे हवाई दलाचे उपप्रमुख धारकर यांची उचलबांगडी? सरकारने केली पाकड्यांची पोलखोल  

Who is Air Marshal Sujeet Pushpakar Dharkar? : सुजीत धारकर यांनी पाकिस्तानशी युध्द करण्यास नकार दिल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचा दावा पाकसमर्शित सोशल मीडिया अकाऊंटवरून केला जात आहे.

Rajanand More

India Vs Pakistan Social Media War : भारताकडून पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील छोट्या-मोठ्या प्रत्येक घडामोडींवर सोशल मीडियात प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या काही सोशल मीडियातील अकाऊंटवर एअर मार्शल सुजीत धारकर यांच्याविषयी खोटी माहिती पसरवली जात असल्याचे समोर आले आहे.

भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख सुजीत धारकर यांनी पाकिस्तानशी युध्द करण्यास नकार दिल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचा दावा पाकसमर्शित सोशल मीडिया अकाऊंटवरून केला जात आहे. केंद्र सरकारने हा दावा खोडून काढला आहे. हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून सुजीत धारकर हे मागील महिन्यात निवृत्त झाले आहेत, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटने सोशल मीडियात याबाबत खुलासा केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, एअर मार्शल धारकर हे उपप्रमुख म्हणून 30 एप्रिलला निवृत्त झाले आहे. त्यांनी हवाई दलात 40 वर्षे सेवा केली आहे. अनेक प्रो-पाकिस्तानी सोशल मीडिया अकाऊंटवरून करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे फॅक्ट चेक युनिटने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, धारकर यांनी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांच्याआधी या पदावर एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग हे होते. सिंग हे सध्या हवाई दलाचे प्रमुख आहेत. धारकर यांनी हवाई दलात अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. फायटर पायलट म्हणून त्यांची हवाई दलात ओळख होती.

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची स्थिती असतानाच धारकर निवृत्त झाले आहेत. त्यामुळे पाकड्यांकडून त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याची खोटी माहिती सोशल मीडियात पसरवली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतावर सायबर हल्ला करण्याचा प्रयत्नही पाकिस्तानी हॅकर्सकडून केला जात असल्याचे समोर आले आहे. मात्र, भारताच्या सक्षम यंत्रणेमुळे हा सायबर हल्ला परतवून लावला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT