PM किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील लहान व सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. शेतीसाठी लागणारा खर्च, बियाणे, खते, औषधे यासाठी शेतकऱ्यांना आधार मिळावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. योजनेत पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
सध्या शेतकरी 22 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या हप्त्यापूर्वी केंद्र सरकारने काही महत्त्वाचे नियम स्पष्ट केले आहेत. e-KYC पूर्ण असणे, Farmer ID अपडेट असणे आणि कागदपत्रांमध्ये कोणतीही तफावत नसणे अत्यावश्यक आहे. हे नियम पूर्ण न केल्यास हप्ता थांबू शकतो, असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे.
याचदरम्यान एक मोठा प्रश्न अनेक शेतकरी कुटुंबांमध्ये निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पती आणि पत्नी दोघांनीही स्वतंत्रपणे PM किसान योजनेसाठी अर्ज केले आहेत. अशा परिस्थितीत दोघांनाही 2 हजार रुपयांचा हप्ता मिळेल का, याबाबत संभ्रम आहे. सरकारच्या नियमांनुसार PM किसान योजनेचा लाभ एका शेतकरी कुटुंबाला दिला जातो. कुटुंबामध्ये पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले यांचा समावेश होतो. त्यामुळे एका कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच पती आणि पत्नी दोघांनाही स्वतंत्रपणे हप्ता मिळणार नाही.
जर पती आणि पत्नी दोघांनीही अर्ज केला असेल, तर अशा प्रकरणांमध्ये तपासणी केली जाते. अपात्र लाभार्थी आढळल्यास त्यांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो किंवा आधी मिळालेली रक्कम परत घेण्याची कारवाईही होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियम समजून घेऊनच अर्ज करणे अत्यंत गरजेचे आहे.
आपला PM किसान योजनेचा स्टेटस तपासण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर जावे. तेथे ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपला नोंदणी क्रमांक टाकावा. नोंदणी क्रमांक लक्षात नसेल तर ‘Know Your Registration Number’ या पर्यायावरून तो मिळवता येतो.
पुढे नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड भरून ‘Get Details’ वर क्लिक केल्यास आपला हप्ता आणि अर्जाची सविस्तर माहिती पाहता येते.
22 व्या हप्त्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांनी e-KYC, Farmer ID आणि अर्जातील माहिती तपासून घ्यावी, जेणेकरून कोणताही अडथळा न येता योजनेचा लाभ वेळेवर मिळू शकेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.