Voting Ink Controversy : मतदानाच्या शाईवर वाद; पुण्यात थिनरने शाई पुसण्याचा प्रकार, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

Voting Ink Controversy in Pune : पुण्यात मतदानाच्या शाईवरून वाद निर्माण झाला असून थिनरने शाई पुसल्याचा दावा करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे
Voting Ink Controversy : मतदानाच्या शाईवर वाद; पुण्यात थिनरने शाई पुसण्याचा प्रकार, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महानगरपालिका निवडणुकी दरम्यान मतदान केंद्रांवर मतदारांच्या बोटावर लावलेल्या मतदानाच्या शाई (इंडेलिबल इंक) सहज पुसली जाण्याच्या तक्रारी राज्यभरातून येत आहे. अनेक ठिकाणी मार्कर पेनचा वापर केल्यामुळे ही शाई फिनर किंवा सॅनिटायझरने लगेच निघत असल्याचे मतदार सांगत आहेत, ज्यामुळे दुबार मतदान किंवा बोगस मतदानाचा संशय वाढला आहे.

पुण्यातील प्रभाग क्रमांक ३४ (नहे, वडगाव बुद्रुक, धायरी) मधील धायरी फाट्याजवळ असलेल्या नारायणराव सणस विद्यालय मतदान केंद्राबाहेर मतदानानंतर बोटावरील शाई लिक्विड किंवा थिनरच्या साहाय्याने पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेच्या कार्यकर्त्यांनी पकडले आणि त्याला चोप दिल्याचे समोर आले आहे.

Voting Ink Controversy : मतदानाच्या शाईवर वाद; पुण्यात थिनरने शाई पुसण्याचा प्रकार, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
BSP Chief Mayawati : धूर, गोंधळ अन् कार्यकर्त्यांची पळापळ! भर पत्रकार परिषदेत मायावतींसमोर नेमकं काय झालं?

याबाबत राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून देखील आक्षेप नोंदवण्यात येत असताना आता निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने याबाबत आपले निवेदन प्रसिद्ध केले आहे. यांत म्हंटले आहे की बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैर कृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.

बोटावरची शाई पुसून कोणी चुकीचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आले असल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आला आहे.

Voting Ink Controversy : मतदानाच्या शाईवर वाद; पुण्यात थिनरने शाई पुसण्याचा प्रकार, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
Kolhapur News: प्रचार थांबल्यानंतर सोशल मीडियावर झळकलेले 66 उमेदवार अडचणीत; पोलीस-निवडणूक प्रशासनाचा दणका

तसेच मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०११ रोजी आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी आदेश दिले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com