PM Modi Ayodhya Sarkarnama
देश

PM Modi Ayodhya : 22 जानेवारीला अयोध्येत येऊ नका; मोदी असे का म्हणाले...

PM Modi Ayodhya Visit : रोड शो आणि विकासकामांचे लोकार्पण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्या दौरा चर्चेत...

Sachin Fulpagare

Ayodhya Latest News : पंतप्रधान मोदींनी अयोध्येत पोहोचताच रोड शो केला. हा रोड शो 8 किलोमीटरचा होता. यासोबतच पंतप्रधान मोदींनी अयोध्या स्टेशनचे लोकार्पणही केले. तसेच वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. यानंतर पंतप्रधान मोदींनी एका सभेला संबोधित केले.

अयोध्या धाममध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण आणि पायाभरणी केल्याने आपल्याला अभिमान वाटतोय. संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट बघतेय. अयोध्येतील हा उत्साह साहजिकच आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

'4 कोटी गरिबांना पक्क घर मिळालं'

एक काळ असा होता त्यावेळी रामलल्ला एका झोपडीत होते. आता त्यांना पक्के घर मिळाले आहे. पक्क घर फक्त रामलल्लालाच नाही तर देशातील 4 कोटी गरिबांनाही मिळले आहे. आता घरोघरी पाणी पोहोचवत आहेत. त्यासाठी 2 लाखांहून अधिक टाक्या उभारल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधानांचं देशवासीयांना आवाहन

22 जानेवारीला नागरिकांनी अयोध्येत येऊ नये. 22 जानेवारीच्या ऐतिहासिक सोहळ्यात उपस्थित राहण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. पण सर्वांनाच हे शक्य नाही. 22 जानेवारीला विधिपूर्वक कार्यक्रम झाल्यानंतर सर्व रामभक्तांनी आपल्या सोयीनुसार दर्शन घ्यावे. पण 22 जानेवारीला येण्याचा विचार करू नका, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अयोध्ये धाम स्टेशनची एकूण क्षमता ही 10-15 हजार प्रवाशांची आहे. पण हे जंक्शन पूर्णपणे विकसित झाल्यावर त्याची क्षमता 60 हजार प्रवासी इतकी होईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच अयोध्या धाम विमानतळ आणि रेल्वे स्टेशनचे लोकर्पण करण्याचे भाग्य मिळाले, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Edited by Sachin Fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT