Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला सोनिया गांधी उपस्थित राहणार?

Ayodhya Ram Mandir Opening Ceremony Will Sonia Gandhi Attend? : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे...
Sonia Gandhi
Sonia GandhiSarkarnama
Published on
Updated on

Ram Mandir Ayodhya Opening Ceremony : राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी या उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अयोध्येत येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला सोनिया गांधीही उपस्थित राहतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांना रामललाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. पण मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे कोण-कोणते नेते उपस्थित राहणार, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Sonia Gandhi
Ayodhya Railway Station : अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखले जाणार भव्य जंक्शन

निमंत्रणासाठी आभारी- काँग्रेस

अयोध्येतील राम मंदिरात येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात पक्षाचे वरिष्ठ नेते सहभागी होणार की नाही? या काँग्रेसकडून गुरुवारपर्यंत कुठलीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नव्हती. मात्र, आता निमंत्रणाबद्दल काँग्रेस पक्षाकडून अभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने याबाबत निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

22 जानेवारीला चित्र स्पष्ट होणार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंगजन चौधरी यांना 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. श्रीराम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टकडून काँग्रेस नेत्यांना निमंत्रण देण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणार का? असा प्रश्न काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना विचारण्यात आला. पक्षाची भूमिका काय आहे? याची माहिती दिली जाईल. तसेच 22 जानेवारीला उपस्थितीबाबत हे स्पष्ट होईल, असे वेणुगोपाल म्हणाले.

विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील उपस्थितीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. डाव्या पक्षातील बहुतेक नेत्यांनी 22 जानेवारीच्या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. तर सोहळ्यातउपस्थित राहण्याबाबत अद्याप काँग्रेसकडून अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही.

Sonia Gandhi
Ayodhya Ram Mandir : रामभक्त मुस्लीम तरुणीची मुंबई ते अयोध्या पायी यात्रा; भगवा हाती घेत करतेय 1425 किलोमीटरचा प्रवास

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com