Narendra Modi political strategy for BJP growth: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गेल्या काही वर्षांत देशातील अनेक राज्यांमध्ये आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. एकेकाळी अशक्य वाटणाऱ्या राज्यांमध्येही पक्षाने सत्ता स्थापन करत नवे राजकीय समीकरण तयार केले. विशेष म्हणजे काही राज्यांमध्ये भाजपने पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद मिळवत इतिहास घडवला तसेच नवे राजकीय समीकरणही निर्माण केले.
गेल्या काही वर्षांत भाजपने हरियाणा, महाराष्ट्र, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, ओडिशा, बिहार आणि पश्चिम बंगाल अशा एकूण 9 राज्यांमध्ये पहिल्यांदाच सत्ता मिळवण्याचा मोठा टप्पा गाठला. हरियाणामध्ये 2014 मध्ये मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने स्वतंत्र बहुमत मिळवले. त्याच वर्षी भाजपने देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली.
ईशान्य भारतातही भाजपने मोठी झेप घेतली. 2016 मध्ये आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली पहिली मोठी एंट्री झाली. त्याच काळात अरुणाचल प्रदेशमध्ये पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. 2017 मध्ये मणिपूरमध्ये एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली पहिली भाजप आघाडी सरकार स्थापन झाली. 2018 मध्ये त्रिपुरामध्ये बिप्लब कुमार देब यांच्या नेतृत्वाखाली 25 वर्षांची डाव्या पक्षांची सत्ता संपुष्टात आली.
यानंतर ओडिशामध्ये 2024 मध्ये मोहन चरण माझी यांच्या नेतृत्वाखाली नवीन पटनायक यांच्या 24 वर्षांच्या सत्तेला पूर्णविराम मिळाला. बिहारमध्ये 2026 मध्ये सम्राट चौधरी यांनी 15 एप्रिल रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नवीन अध्याय सुरू केला. आणि आता पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी यांच्या दीर्घकालीन सत्तेला मोठे आव्हान देत भाजपने आपली ताकद सिद्ध केली आहे.
तरीही अजून काही राज्ये अशी आहेत जिथे भाजपला सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. नागालँड, मेघालय, आंध्र प्रदेश, तेलंगणा, जम्मू-कश्मीर, पंजाब, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये पक्ष अजूनही संधीच्या शोधात आहे. विशेषतः दक्षिण भारत आणि काही सीमावर्ती राज्यांमध्ये भाजपची उपस्थिती मर्यादित असली तरी पक्ष हळूहळू आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे.
एकूणच, भाजपने देशभरात आपले राजकीय जाळे मजबूत करत अनेक नवीन राज्यांमध्ये सत्ता मिळवली आहे. मात्र उर्वरित राज्यांमध्ये विजय मिळवणे हेच पुढील मोठे आव्हान असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.