Bangladesh New Government News : बांगलादेशात मागील काही दिवासांत प्रचंड उलथापालथ झाली आहे. मोठ्याप्रमाणावर हिंसाचार आणि अराजकतेच्या वातावरणात शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडला. त्यानंतर आता तेथे मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्वात अंतिरम सरकार आलं आहे. या सरकारचे प्रमुख म्हणून गुरुवारी यूनुस यांनी शपथ घेतली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. याचबरोबर मोदींनी बांगलादेशमधील अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी मोहम्हद यूनुस यांना शुभेच्छा देत म्हणाले की, प्राध्यापक मोहम्मद यूनुस यांना नवी जबाबदारी स्वीकारल्याबद्दल माझ्याकडून शुभेच्छा. आम्ही बांगलादेशात हिंदू आणि अन्य सर्व अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा सुनिश्चित करून सामान्य स्थितीत लवकर परतण्याची आम्ही अपेक्षा बाळगतो. तसेच मोदींनी पुढे म्हटले की, शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी आपल्या दोन्ही नागरिकांच्या सामायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारत बांगलादेशसोबत काम करण्यास कटिबद्ध आहे.
नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद यूनुस(Muhammad Yunus) यांनी गुरुवारी बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून शपथ घेतली. या शपथविधीआधी यूनुस यांनी म्हटले की, सरकार बांगलादेशात लोकांची सुरक्षितता सुनिश्चित करेल.
याशिवाय यूनुस यांनी बांगलादेशाच्या पुननिर्मिणासाठी तेथील तरुणांना मदतीचेही आवाहन केले. त्यांनी बांगलादेशमधील तरुणांना म्हटले की, आपल्याला या स्वातंत्र्याचे रक्षण करायेच आहे. तर शपथविधीसाठी तयार झालेल्या यूनुस यांनी सांगितले की त्यांचे पहिले कार्य बेकायदेशीर कृत्ये आणि अल्पसंख्यांकावरील हल्ले रोखण्यासह कायदा व सुव्यवस्था निर्माण करणे आहे.
जोपर्यंत बांगलादेशात निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत मोहम्मद यूनुस हे अंतरिम सरकारचे कामकाज पाहतील. बांगलादेशमधील निर्वाचित सरकार स्थापन होईपर्यंत आता अंतिरम सरकारच देशाचा कारभार पाहणार आहे. बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उज-जमां यांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर म्हटले होते की, बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन केले जाईल.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.