India US relations : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मागील १२ वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, असा आरोप करत विरोधकांकडून त्यांच्यावर सातत्याने टीका केली जाते. आता भारतातील अमेरिकेच्या राजदुतांनी केलेल्या गौप्यस्फोटाने विरोधकांच्या टीकेची धार आणखी वाढली आहे. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवेळी भारताला पत्रकार परिषद नको होती, असा खुलासा या राजदुतांनी केला आहे.
भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी एका कार्यक्रमात बोलताना हा दावा केला आहे. फ्रान्समध्ये आयोजित कऱण्यात आलेल्या जी ७ बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली होती. या भेटीवेळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले जाऊ नये, असे भारताने अमेरिकेला सांगितले होते. ट्रम्प यांनीही तशी तयारी दर्शविली होती, असे गौर यांनी म्हटले आहे.
भेटीनंतर ट्रम्प कदाचित हे विसरले आणि त्यांनी पत्रकारांशी बोलू लागले. त्यामुळे त्या चर्चेचे रुपांतर ४५ मिनिटांच्या पत्रकार परिषदेत झाल्याचा खुलासा गौर यांनी केला आहे. दोन्ही नेत्यांची १७ जून रोजी भेट झाली होती. या भेटीबाबत माहिती देताना गोर म्हणाले, आम्ही व्यासपीठाच्या मागे होतो. एका क्षणी तिथे फक्त राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि मी होतो.
‘भारतीय कोणते मुद्दे उपस्थित करणार आहेत?’, असे ट्रम्प यांनी मला विचारले होते. त्यावर मी त्यांना सांगितले होते की, ‘माध्यमांना आत येऊ द्या, पण पत्रकार परिषद नको, अशी परराष्ट्र मंत्रालयाकडे मागणी होती, असे राष्ट्राध्यक्षांना सांगितल्याची आठवण राजदूतांनी कार्यक्रमात सांगितली. त्यावर ट्रम्प यांनीही होकार दर्शविला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये ५० कॅमेरे आणि माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर बैठक सुरू झाली. दोघांनीही काही मिनिटे आपली भूमिका मांडली. मात्र, त्यानंतर ट्रम्प कॅमेराकडे वळाले आणि त्यांनी पत्रकारांना काही प्रश्न आहेत का, अशी विचारणा केली. त्यानंतर जवळपास ४५ मिनिटे सर्व मुद्द्यांवर पत्रकार परिषद झाली, असे गोर यांनी सांगितले.
दरम्यान, गोर यांच्या या गौप्यस्फोटानंतर विरोधकांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. मोदींना प्रश्नांची किती भीती वाटते, याचा पुरावा पाहा, असे काँग्रेसने गोर यांचा व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे. या भीतीमुळे त्यांनी आजपर्यंत एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.