Narendra Modi Oath Ceremony Sarkarnama
देश

PM Modi News : एक नव्हे तीन राज्यांचा स्थापना दिवस आहे एकाच दिवशी; मोदींनी दिल्या खास शुभेच्छा म्हणाले....

Narendra Modi News : जाणून घ्या, ही कोणती तीन राज्ये आहेत ज्यांचा स्थापना दिवस आहे आज?

Mayur Ratnaparkhe

पंतप्रधान मोदींनी मंगळवारी एक नव्हे दोन नव्हे तर तीन राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त या राज्यांमधील जनतेला विशेष शुभेच्छा दिल्या. मात्र एकाच दिवशी स्थापना दिवस साजरी करणारी देशातील ही तीन राज्ये कोणती? हे आपण जाणून घेऊयात. पंतप्रधान मोदींनी मणिपूर, मेघालय आणि त्रिपूरा या तिन्ही राज्याच्या स्थापना दिनानिमित्त मंगळवारी या राज्यातील जनतेसाठी शुभेच्छा संदेश दिला.

यावेळी पंतप्रधान मोदींनी(Narendra Modi) या तिन्ही राज्यांचे कौतुक करत देशाच्या विकासात मणिपूर, मेघालय आणि त्रिपूरा या राज्यांमधील लोकांच्या योगदानाचीही प्रशंसा केली. ही तिन्ही राज्ये आज आपला स्थापना दिवस साजरा करत आहेत.

या तिन्ही राज्यांना 21 जानेवारी 1972 पूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता. ही तिन्ही राज्ये देशाच्या ईशान्येला स्थित आहेत आणि आपली जिवंत संस्कृती, प्रेरक इतिहासाबरोबर प्राकृतिक सुंदरतेसाठी जाणली जातात.

पंतप्रधान मोदींनी एक्सवर एका पोस्टमध्ये मणिपूरच्या जनतेला राज्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आणि म्हटले की, ईशान्येतील हे राज्य आपली प्राकृतिक सुंदरता आणि लोकांच्या मेहनती प्रवृत्तीसाठी ओळखलं जातं. त्यांनी म्हटले की, येणाऱ्या काळात राज्याच्या निरंतर विकासासाठी प्रार्थना करतो.

याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनीही मणिपूर, मेघालय आणि त्रिपूराच्या स्थापना दिनी मंगळवारी या राज्यातील लोकांना शुभेच्छा दिल्या आणि आशावाद व्यक्त केला की राज्य विकासाच्या मार्गावर चालत यशाची नवीन शिखरं गाठेल. त्यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत तिन्ही राज्यांमधील लोकांना शुभेच्छा दिल्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT